Home /News /national /

जन्मदाती आईचं झाली वैरी, पोटच्या मुलीवर केले तब्बल 20 वेळा वार; सांगितलं कारण

जन्मदाती आईचं झाली वैरी, पोटच्या मुलीवर केले तब्बल 20 वेळा वार; सांगितलं कारण

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे तब्बल 20 वेळा या निर्दयी आईनं चाकूनं (mother has stabbed) वार केले आहेत.

    वडोदरा, 15 जून: एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडोदरामध्ये (Vadodara) एका आईनं (mother attacked) आपल्या पोटच्या मुलीवर (daughter) चाकूनं हल्ला केला आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे तब्बल 20 वेळा या निर्दयी आईनं चाकूनं (mother has stabbed) वार केले आहेत. मंगळवारी दुपारी पोलीस नियंत्रण कक्षाला एका महिलेचा फोन आला. त्या महिलेनं पोलिसांना मी माझ्या मुलीची हत्या केली आहे, असं सांगितलं. महिलेचा फोन येताच पोलिसांनी आजवा रोडवरील महिलेच्या निवासस्थानी धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्या महिलेची 13 वर्षीय मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. राष्ट्रपतिपदाची निवडणूक: शरद पवारांचं मन वळवण्याचे जोरदार प्रयत्न, विरोधकांची आज दिल्लीत बैठक पोलीस महिलेच्या घरी पोहोचल्यावर त्यांना मुलगी जिवंत असल्याचं समजलं. पोलिसांना तिच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा दिसल्या. पोलिसांनी मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आईनेच आपल्याच पोटच्या मुलीवर चाकूने वार केल्यानं आम्हाला ही धक्का बसला. मुलीच्या आईनं तिच्या मानेवर आणि शरीराच्या इतर अवयवांवर सुमारे 20 वार केले. पण बहुतांश जखमा ओरखडासारख्या होत्या, असं समा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक भावना पटेल यांनी सांगितलं. आईने मुलीवर हल्ला का केला, असे विचारले असता भावना पटेल म्हणाले, गेल्या अडीच महिन्यांपासून आई-मुलीचे घरातील कामावरून जोरदार वाद होत होते. आईने आम्हाला सांगितलं की, मुलीने तिला घरी मदत केली नाही आणि उद्धटपणे वागली. मंगळवारी या दोघीमध्ये पुन्हा वाद झाला आणि त्यानंतर महिलेचा संयम सुटला आणि तिनं तिच्यावर वार केले, असं पोलिसांनी सांगितलं. 50 पोलीस, 2 बुलेटप्रूफ गाड्या, व्हिडिओग्राफी; आज सर्वांसमोर येणार लॉरेन्स बिष्णोई पोलिसांनी सांगितले की, 39 वर्षीय महिला घटस्फोटीत असून ती एकटीच आपल्या मुलीचं संगोपन करत आहे. इंटरनेटवर तिचे व्हिडिओ अपलोड करून ती काही पैसे कमवते. ही मुलगी शहरातील एका खाजगी शाळेत आठवीत शिकते. पोलिसांनी सांगितले की, महिलेने ज्या प्रकारे मुलीला जखमी केले, त्यावरून असे दिसते की तिला मारायचं नव्हतं. अल्पवयीन मुलगी बोलू शकल्यानंतर, आम्ही तिची बाजू समजून घेऊ आणि हिंसक हल्ल्यामागे आणखी काही कारण आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करू, असं पटेल म्हणाल्या. मुलीवर अद्याप उपचार सुरू असून तिचे शहरात कोणतेही नातेवाईक नसल्याने पोलिसांनी अद्याप तक्रार दाखल केलेली नाही.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime, Daughter, Gujrat, Mother

    पुढील बातम्या