मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Sidhu Moose Wala Case: 50 पोलीस, 2 बुलेटप्रूफ गाड्या, व्हिडिओग्राफी; आज सर्वांसमोर येणार लॉरेन्स बिष्णोई

Sidhu Moose Wala Case: 50 पोलीस, 2 बुलेटप्रूफ गाड्या, व्हिडिओग्राफी; आज सर्वांसमोर येणार लॉरेन्स बिष्णोई

Sidhu Moose Wala Case: पोलिसांना दिल्ली कोर्टाकडून (Delhi Court)एक दिवसाची ट्रान्झिट रिमांड मिळाली आहे.

Sidhu Moose Wala Case: पोलिसांना दिल्ली कोर्टाकडून (Delhi Court)एक दिवसाची ट्रान्झिट रिमांड मिळाली आहे.

Sidhu Moose Wala Case: पोलिसांना दिल्ली कोर्टाकडून (Delhi Court)एक दिवसाची ट्रान्झिट रिमांड मिळाली आहे.

चंदीगड, 15 जून: Lawrence Bishnoi Delhi to Punjab: पंजाब पोलीस आता सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala Murer Case) हत्या प्रकरणातील आरोपी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईची (Lawrence Bishnoi)चौकशी करणार आहेत. यासाठी पोलिसांना दिल्ली कोर्टाकडून (Delhi Court)एक दिवसाची ट्रान्झिट रिमांड मिळाली आहे. त्यानंतर त्याला आज मानसा न्यायालयात न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येणार आहे. पंजाब पोलिसांनी (Punjab police) बिष्णोईला दिल्लीहून (Delhi) पंजाबला (Punjab) नेण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे. यासाठी 50 पोलीस कर्मचारी (Policemen), 2 बुलेट प्रूफ (Bulletproof Vehicles) वाहने, मार्ग मोकळा ठेवण्यासाठी 12 अन्य वाहने तैनात करण्यात येणार असून बिष्णोईला घेऊन जाणाऱ्या मार्गाची व्हिडिओग्राफी (Videography)करण्यात येणार आहे. पंजाब पोलिसांनी न्यायालयात ही माहिती दिली आहे.

लॉरेन्स बिष्णोईचे वकील ऍडव्होकेट चोप्रा यांनी बिष्णोईला पंजाबमध्ये नेण्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीचा संदर्भ दिला होता. यावर पंजाब पोलिसांच्या वकिलाने कोर्टात युक्तिवाद केला की, लॉरेन्स बिष्णोईला पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिल्यास सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी पंजाब पोलीस घेतील.

सुरक्षेसाठी पंजाब पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

सुरक्षेबाबत आपला युक्तिवाद करताना पंजाब पोलिसांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, पंजाब पोलिसांचे सुमारे 50 पोलीस कर्मचारी, दोन बुलेट प्रूफ वाहने, 12 वाहने मार्गावर असतील. ज्यामुळे संपूर्ण मार्ग मोकळा होईल. सर्व मार्गांचे व्हिडिओग्राफी करण्यात येणार आहे. पंजाब पोलिसांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या संपूर्ण आदेशाचे पालन केले जाईल. यानंतर दिल्ली न्यायालयाने पंजाब पोलिसांना गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईला अधिकृतपणे अटक करण्याची परवानगी दिली आहे. आता तिहार तुरुंगात बंद असलेल्या लॉरेन्स बिष्णोईचा ताबा पंजाब पोलिसांकडे सोपवण्यात येणार आहे.

पुन्हा चकमक, पुन्हा दहशतवादी ठार..!, लष्कर-ए-तैयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

मंगळवारी दिल्लीतील (Delhi Court) एका न्यायालयाला पंजाब पोलिसांनी (Punjab Police)सांगितले की लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi)हा गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे. गुंडाच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी करताना, त्याची कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. लॉरेन्सला पंजाबमध्ये (Punjab)आणण्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था (Security Arrangements)करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी मंगळवारी कायद्यानुसार बिष्णोईला मुख्य न्यायदंडाधिकारी (CJM) मानसाच्या न्यायालयात (Court) हजर करण्यासाठी ट्रान्झिट रिमांडची मागणी केली. न्यायालयाने पंजाब पोलिसांची ही मागणी मान्य करत पंजाब पोलीस लॉरेन्सला औपचारिकपणे (Official Arrest)अटक करू शकतात, असा आदेश दिला.

First published:
top videos

    Tags: Chandigarh, Punjab