जाहिरात
मराठी बातम्या / देश / ...आणि बघता बघता अख्खा डोंगर खचला, पाहा थरारक LIVE VIDEO

...आणि बघता बघता अख्खा डोंगर खचला, पाहा थरारक LIVE VIDEO

...आणि बघता बघता अख्खा डोंगर खचला, पाहा थरारक LIVE VIDEO

या व्हिडीओमध्ये निसर्गाचे रौद्ररूप दिसत आहे. मुसळधार पावसामुळे एका क्षणात संपूर्ण डोंगर खचला.

  • -MIN READ
  • Last Updated :

देहरादून, 20 ऑगस्ट : देवभूमी उत्तराखंडवर सध्या अस्मानी संकट आले आहे. उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी दरड कोसळली आहे, तर डोंगर-दऱ्या खचत चालल्या आहेत. पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. केदारनाथ यात्रा आज दुसऱ्या दिवशीही बंद आहे. पदपथ आणि महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. काल रात्री केदारघाटीमध्ये मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, उत्तरकाशी येथे जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस पडला. यातच काही भागांत डोंगर खचल्याचेही समोर आले आहे. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये निसर्गाचे रौद्ररूप दिसत आहे. मुसळधार पावसामुळे एका क्षणात संपूर्ण डोंगर खचला. हा व्हिडीओ पिथाैरागडमधला आहे. जेथे पावसामुळे डोंगर खचलेला दिसत आहे. वाचा- रस्त्याच्या दुतर्फा आग, अंगावर ठिगण्या उडत असूनही त्यानं गाडी थांबवली नाही!

जाहिरात

वाचा- 72 तासांपासून जळतंय अख्खं शहर, पाहा कॅलिफोर्नियातील अग्नीतांडवाचे VIDEO तर, काही ठिकाण लोकं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकत असल्याचे दिसत आहे. लाकडाच्या पूलावरून नदी पार करताना हा व्हिडीओ समोर आला आहे.

वाचा- पावसामुळे रस्ता धजला अन् जमिनीखाली गाडल्या गेल्या 21 गाड्या, पाहा VIDEO 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता! हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः पिथौरागड, बागेश्वर आणि चमोलीसाठी विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे, तर इतर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे. राज्य हवामान केंद्राचे संचालक बिक्रम सिंह म्हणाले की, गुरुवारी पिथौरागड, बागेश्वर आणि चमोलीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैनीताल, उधमसिंह नगर, देहरादून, हरिद्वार, टिहरी आणि पौरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात