मराठी बातम्या /बातम्या /देश /

Uttarakhand Election Results 2022: उत्तराखंडमधून पहिला कल हाती, देवभूमीमध्ये भाजपला 10 जागांवर आघाडी

Uttarakhand Election Results 2022: उत्तराखंडमधून पहिला कल हाती, देवभूमीमध्ये भाजपला 10 जागांवर आघाडी

Uttarakhand Assembly Election 2022 Result: उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. उत्तराखंडमध्ये कोणत्याच पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला नव्हता, तरी भाजपने नेतृत्वाची जबाबदारी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी तर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि आपने अजय कोठियाल यांना दिली होती.

पुढे वाचा ...
  • Published by:  Sunil Desale

उत्तराखंड, 10 मार्च : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणीला (Assembly Election result counting starts) सुरुवात झाली आहे. पोस्टल बॅलट मतमोजणीला सुरुवात (Counting begins) झाली असून आता कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने 10 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने 7 जागांवर आघाडी घेतली आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीमध्ये (Uttarakhand Assembly Election) कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. उत्तराखंडमध्ये कोणत्याच पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला नव्हता, तरी भाजपने नेतृत्वाची जबाबदारी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी तर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि आपने अजय कोठियाल यांना दिली होती.

2017 मध्ये उत्तराखंडमध्ये काय होती स्थिती?

2017 साली भाजपने 70 पैकी 57 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 11 आणि इतर पक्षांना 2 जागा जिंकता आल्या होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळूनही भाजपला उत्तराखंडमध्ये मागच्या वर्षी चार महिन्यात तीनवेळा मुख्यमंत्री बदलावे लागले होते. 4 वर्ष त्रिवेंद्रसिंग रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते, पण पक्षांतर्गत नाराजीमुळे रावत यांच्याऐवजी तिरथसिंग रावत यांना मुख्यमंत्री केलं. कोरोना व्हायरसमुळे निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकांवर बंदी घातली होती, त्यामुळे तिरथसिंग रावत मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढच्या 6 महिन्यात त्यांना विधानसभेचं सदस्य होणं शक्य नव्हतं, त्यामुळे तिरथसिंग यांना राजीनामा द्यावा लागला. तिरथसिंग रावत यांच्यानंतर पुष्कर सिंग धामी यांना भाजपने उत्तराखंडचं मुख्यमंत्री केलं. 10 मार्च ते 4 जुलै या 4 महिन्यांच्या काळात भाजपला उत्तराखंडमध्ये 3 मुख्यमंत्री बदलावे लागले.

Election Results 2022 Live Updates: कोणाच्या डोक्यावर सजणार विजयाचा मुकूट?, पहा मतमोजणीचे प्रत्येक अपडेट्स

उत्तराखंडमध्ये ABP C-Voter च्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसची मुसंडी

एबीपी न्यूज आणि सी-व्होटरच्या (ABP News C-Voter) एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्ये (Uttarakhand Exit Poll) भाजपला (BJP) धक्का बसणार आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेस (Congress) सगळ्यात मोठा पक्ष ठरू शकतो. एबीपी आणि सी-व्होटरच्या एक्झिट पोल नुसार भाजपला 26 ते 32, काँग्रेसला 32 ते 38, आप ला 0 ते 2 आणि इतरांना 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

उत्तराखंडमध्ये Times Now VETO एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत

टाईम्स नाऊ आणि आणि व्हिटोच्या (Times Now Veto Exit Poll) सर्व्हेनुसार उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत मिळत आहे. उत्तराखंडच्या 70 जागांपैकी 37 जागांवर भाजपचा विजय होईल, तर काँग्रेसला 31 जागांवर यश मिळेल. आपला 1 आणि इतरांना एका जागेवर समाधान मानावं लागेल, असा अंदाज टाईम्स नाऊ आणि व्हिटोच्या एक्झिट पोलमध्ये मांडण्यात आला आहे.

टीव्ही 9 - पोलस्ट्रेटच्या एक्झिट पोलनुसार आप ठरणार किंग मेकर

टीव्ही 9 आणि पोलस्ट्रेटच्या सर्व्हेनुसार उत्तराखंडमध्ये काँग्रेसला 33-35, भाजपला 31-33 जागा मिळतील, तर आम आदमी पक्षला 0-3 जागा आणि इतरांना 0-2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. निवडणुकीच्या निकालानंतरही अशीच आकडेवारी राहिली तर कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही, या परिस्थितीमध्ये आम आदमी पक्ष कोणाला पाठिंबा देतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाच राज्यांत एकूण सात टप्प्यांत झाले मतदान

पहिल्या टप्पा - 10 फेब्रुवारीला मतदान

दुसरा टप्पा -14 फेब्रुवारी

तिसरा टप्पा -20 फेब्रुवारी

चौथा टप्पा -23 फेब्रुवारी

पाचवा टप्पा- 27 फेब्रुवारी

सहावा टप्पा - 3 मार्च

सातवा टप्पा -7 मार्च

पाचही राज्यांची 10 मार्चला मतमोजणी

उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांत एकूण 7 टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर आज म्हणजेच 10 मार्च रोजी मतमोजणी होत आहे.

First published:

Tags: Assembly Election, BJP, Uttarakhand, काँग्रेस