Home /News /national /

स्टंट पडला महागात, फिल्मी स्टाईलनं थांबवत होता ट्रेन; जीव जाताच फरार झाले मित्र

स्टंट पडला महागात, फिल्मी स्टाईलनं थांबवत होता ट्रेन; जीव जाताच फरार झाले मित्र

फिल्मी स्टाईल दाखवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.

    उत्तराखंड, 09 डिसेंबर: उत्तराखंडच्या (Uttarakhand) देहराडूनमध्ये (Dehradun) रेल्वे ट्रॅकवर (Railway Track) फिल्मी स्टाईल दाखवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. बुधवारी संध्याकाळी डिफेन्स कॉलनी गेटजवळ एका मद्यधुंद अवस्थेत एका तरुणानं रुळाच्या मधोमध उभं राहून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान ट्रेनची जोरदार धडक बसल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे घटना घडताच त्याच्यासोबत आलेले त्याचे मित्र तिथून फरार झाले. काही लोकांनी सांगितले की, त्याच्या मित्रांनी या तरुणाला चेतवलं आणि नंतर तेथून पळ काढला. देहराडूनचे जोगीवाला पोलीस चौकीचे प्रभारी दीपक गायरोला यांनी सांगितले की, देहराडून-दिल्ली शताब्दी एक्स्प्रेस बुधवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास डिफेन्स कॉलनी फाटकातून जात होती. यादरम्यान ट्रेनची जोरदार धडक बसल्याने तरुणाचा मृत्यू झाला. हेही वाचा- 14 महिन्यांनंतर माघारी जाणार शेतकरी, 'किसान मोर्चा' आंदोलन स्थगितीची घोषणा दीपक असे मृत तरुणाचे नाव असून, तो पूजावाला येथील रहिवासी आहे. अपघाताच्या वेळी तरुण मद्यधुंद अवस्थेत होता. या प्रकरणी स्थानिक रहिवाशांकडे चौकशी केली असता, हा तरुण त्याच्या काही मित्रांसह तेथे आला होता. ट्रॅकच्या मधोमध फिल्मी स्टाईलमध्ये उभं राहून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न करत होता, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. ट्रेन येताच त्याच्या मित्रांनी तेथून पळ काढला आणि त्यात ट्रेनच्या धडकेनं तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अन्य घटनेत तरुणाने केली आत्महत्या देहराडूनमधील प्रेमनगरला लागून असलेल्या देवीपूर गावात एका तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याच्या कुटुंबीयांनी परिसरातील फायनान्सरवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी फायनान्सरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवीपूर गावात मोहित यादव नावाच्या तरुणाने गळफास लावून घेतल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळाली. हेही वाचा- पहिलं पत्नीला केलं बेशुद्ध; नंतर गळ्यात टाकला फाशीचा दोर, पुढे घडला थरारक प्रकार माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मोहितच्या खोलीची झडती घेतली असता एक सुसाइड नोट सापडली. ज्यामध्ये मोहितनं राजू नेगी नावाच्या व्यक्तीवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Uttarakhand

    पुढील बातम्या