Home /News /national /

14 महिन्यांनंतर माघारी जाणार शेतकरी, 'किसान मोर्चा' आंदोलन स्थगितीची घोषणा

14 महिन्यांनंतर माघारी जाणार शेतकरी, 'किसान मोर्चा' आंदोलन स्थगितीची घोषणा

एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीच्या (Delhi)सीमेवरील शेतकऱ्यांचे (Farmers Agitation) आंदोलन लवकरच संपणार आहे.

    नवी दिल्ली, 09 डिसेंबर: एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीच्या (Delhi)सीमेवरील शेतकऱ्यांचे (Farmers Agitation) आंदोलन लवकरच संपणार आहे. शेतकऱ्यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे. 11 डिसेंबरपासून 'किसान मोर्चा' आंदोलन संपल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर हा शेतकरी आंदोलनस्थळं रिकामी करणार आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने कृषीविषयक तीन कायदे रद्द केल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, ते 11 डिसेंबरपासून दिल्लीच्या पाच सीमा रिकामी करण्यास सुरुवात करतील. गेल्या महिन्यात 19 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागून तिन्ही कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतरही शेतकरी ठाम राहिले. जोपर्यंत सरकार संसदेत कायदा मागे घेत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे त्यांनी सांगितलं.यानंतर त्यांनी आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी, दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. तसेच किमान आधारभूत किंमतीच्या मुद्द्यावर कायदा करण्याची मागणी केली. यासंदर्भात सरकारने एक समितीही स्थापन केली आहे. 11 डिसेंबर रोजी शेतकरी सर्व आंदोलन स्थळं रिकामी करतील. आम्ही येथून निघून जाऊ, 11 तारखेपासून सर्व सीमा रिकाम्या करणार, असे शेतकऱ्यांनी गुरुवारी सांगितले. आम्ही सीमेवरून जात आहोत. एमएसपीसंदर्भात सरकारशी बोलणार आहोत. आमची एक बैठक 15 तारखेला ही आहे. दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांना रितसर पत्र पाठवलं असून, त्यात सर्व प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याचं वृत्त आहे. शेतकऱ्यांवरील खटले मागे (Cases Against Farmers) घेण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. शेतकऱ्यांवरील खटले मागे घेण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. तसेच, जाळपोळ कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. याशिवाय आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यात येणार आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणा सरकारने यापूर्वीच मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई आणि नोकऱ्या जाहीर केल्या आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Delhi News, Farmer protest

    पुढील बातम्या