Home /News /maharashtra /

गिरीश महाजनांच्या अडचणीत?, जळगावात गेलेल्या पुणे पोलिसांनी टेम्पोभर कागदपत्रे घेतली ताब्यात

गिरीश महाजनांच्या अडचणीत?, जळगावात गेलेल्या पुणे पोलिसांनी टेम्पोभर कागदपत्रे घेतली ताब्यात

जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेतील वाद प्रकरणात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

पुणे, 11 जानेवारी : जळगावातील मराठा विद्या प्रसारक मंडळातील (Maratha Vidya Prasarak Mandal jalgaon) वादाच्या प्रकरणात पुण्यातील कोथरूड पोलीस (Kothrud Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर चौकशीसाठी पुणे पोलिसांची टीम जळगावात पोहोचली आणि त्यांनी अनेक ठिकाणी छापेमारी सुद्धा केली. या छापेमारीत पुणे पोलिसांच्या टीमने तब्बल एक टेम्पो भरुन कागदपत्रे जप्त केली असल्याची माहती समोर आली आहे. या प्रकरणात आता भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. पुणे पोलिसांच्या टीमने जळगावातून कागदपत्रे जप्त केली आहेत. संस्थेशी संबंधित कागदपत्र ही भोईटे आणि आणखी एक आरोपी तानाजी यांच्या घरी मिळून आली. ही कागदपत्रे संस्थेत असणं अपेक्षित होतं मात्र, भोईटे आणि आणखी एका व्यक्तीच्या घरात आढळून आली आहेत. या कागदपत्रांतून मोठे लीड मिळण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. काय आहे प्रकरण? जळगाव येथील महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या वादातून अ‍ॅडवोकेट विजय भास्कर पाटील यांनी माजी जलसंपदा मंत्री, आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह भोईटे गटावर निंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा गुन्हा कोथरुड पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्यातील भोईटे गटाच्या नऊ जणांवर मकोका लावण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी चौकशीसाठी पुणे कोथरूड पोलिसांचे पथक जळगावात धडकले असल्याची माहिती समोर आली असून माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाचा : मराठा विद्या प्रसारक संस्था वाद; गिरीश महाजन अडचणीत पुणे पोलिसांची जळगावात झाडाझडती पुणे पोलिसांचे पथक दोन दिवसांपूर्वी जळगावात दाखल झाले आणि त्यांनी अनेक ठिकाणी छापेमारी केली. पोलिसांच्या पथकाने भोईटे कुटुंबीयांसह इतर ठिकाणी झाडाझडती घेतली. महत्त्वाचे धागेदोरे व दस्तावेज पोलिसांकडून हस्तगत केले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गिरीश महाजन हे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून गिरीश महाजन यांना मराठी विद्या प्रसारक संस्था हडप करत होते. मात्र त्यांना तसं न करता आल्याने त्यांनी आपल्याला त्रास दिल्याचा आरोप या प्रकरणातील फिर्यादी अ‍ॅडवोकेट विजय पाटील यांनी केला आहे. पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. ते पुण्यात आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसंच त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर नेले. त्या ठिकाणी मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला. फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीलाही त्यांनी याठिकाणी डांबल असल्याचा आरोप करण्यात आले होते. खोटी तक्रार केल्याचा दावा दरम्यान मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने आपल्या विषयी खोटी तक्रार देवून दीड वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तक्रारी खोटी असून या विरोधात आम्ही कायदेशीर लढा देत असल्याचे गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया देताना म्हटले.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Girish mahajan, Jalgaon, Pune

पुढील बातम्या