प्रियांकांच्या एन्ट्रीनंतर सपा-बसपा बॅकफूटवर; आता दिली इतक्या जागांची ऑफर

प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशाने उत्तर प्रदेशमधील राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 11, 2019 12:34 PM IST

प्रियांकांच्या एन्ट्रीनंतर सपा-बसपा बॅकफूटवर; आता दिली इतक्या जागांची ऑफर

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी: प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशाने उत्तर प्रदेशमधील राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र दिसत आहे. प्रियांका यांना काँग्रेस पक्षातील पद दिल्यानंतर काँग्रेसमध्ये केवळ उत्साह निर्माण झाला नाही तर त्यांचा आत्मविश्वास देखील वाढला आहे. विरोधकांसोबत काँग्रेसच्या मित्र पक्षांमध्ये देखील प्रियांकांच्या राजकीय प्रवेशाची दखल घेतली आहे.

हे देखील वाचा: प्रियांका गांधी राजकारणाच्या मैदानात, UP तील रोड शोमुळे भाजप 'अलर्ट' मोडवर

2019च्या निवडणुकीत मोदी सरकारच्या विरोधात महाआघाडी होण्याआधीच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आघाडीची घोषणा केली होती. दोन्ही पक्षाने उत्तर प्रदेशातील 80 लोकसभेच्या जागांपैकी 38-38 जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. तर दोन जागा आघाडीतील अन्य पक्षांना आणि काँग्रेस पक्षासाठी अमेठी आणि रायबरेली या दोन जागा सोडल्या होत्या. बसपा-सपाने आघाडीची घोषणा केल्यानंतर या दोन्ही पक्षांनी हे देखील स्पष्ट केले होते की आम्ही काँग्रेस पक्षासोबत कोणतीही आघाडी करणार नाही.

वाचा: 'इंदिरा का खून, प्रियंका गांधी कमिंग सून', आता प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात

या सर्व घडामोडीनंतर काँग्रेसने प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात उतरवले. याची दखल सपा-बसपाने घेतली आहे. या दोन्ही पक्षांनी सुरुवातीला काँग्रेससाठी केवळ दोन जागा सोडल्या होत्या. पण आता याच दोन्ही पक्षांनी काँग्रेसला 14 जागा देण्याची तयारी दाखवली आहे. यावर काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाने सपा-बसपाकडे 30 जागा मागितल्या आहेत.

Loading...

प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज राहुल गांधी आणि प्रियांका यांची लखनऊमध्ये रॅली सुरु आहे.


VIDEO : 'एकट्याने काम होत नाही, सामुहिक कार्याची गरज' ; गडकरींचा पुन्हा धमाका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 12:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...