आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसने एक महत्त्वाचा निर्णय घेत प्रियांका गांधी यांच्याकडे कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली आहे.
2/ 12
उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारीही प्रियांका गांधींकडे देण्यात आली आहे
3/ 12
गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत प्रियांका सहभागी झाल्याचं चित्र दिसत होतं. राजस्थानमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदाचा पेच तयार झाला तेव्हा त्यांनीच पुढाकार घेतला होता.
4/ 12
सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी प्रचंड स्पर्धा होती. तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी प्रियांका या भाऊ राहुल गांधी यांच्या मदतीला धावल्या होत्या.
5/ 12
प्रियांका यांनी आतापर्यंत निवडणूक लढवलेली नसली तरीही त्या याआधीही अनेकदा राजकीय मंचावर दिसल्या आहेत.
6/ 12
राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ अमेठी आणि सोनिया गांधी जिथून निवडून येतात त्या रायबरेली या मतदारसंघात प्रियांका नियमितपणे अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असतात.
7/ 12
गेल्या काही वर्षांपासून प्रियांका गांधी यांच्या राजकारणात सक्रिय होण्याची फक्त चर्चाच होत होती. पक्षाच्या कामात पुढे असणाऱ्या प्रियांका या सक्रिय राजकारणापासून मात्र लांब होत्या.
8/ 12
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळीही त्यांच्या राजकारणात प्रवेश करण्याबद्दल चर्चा झाली होती. तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला होता. त्यांनी राजकारणात सक्रिय व्हावे अशी इच्छा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात होती.
9/ 12
गेल्या वर्षी सोशल मीडियावर 'इंदिरा का खून, प्रियंका गांधी कमिंग सून' अशी पोस्टही कॉँग्रेस कार्यकर्त्यांकडून शेअर करण्यात आली होती.
10/ 12
प्रियांका गांधी यांचे व्यक्तिमत्व भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारखे असल्याने त्यांचे नाव वारंवार समोर येत होते.
11/ 12
प्रियांका गांधींच्या सक्रिय राजकारणात येण्याच्या चर्चेने विरोधकांमध्ये धाकधूक वाढली आहे. प्रियांका गांधींच्या राजकारणात प्रवेशाचा परिणाम उत्तर प्रदेशासह देशाच्या राजकारणावर होऊ शकतो
12/ 12
भाजपचा गड हिसकवण्यासाठी प्रियकांच्या उमेदवारीची मागणी केली जात आहे. भोपाळ शहरात प्रियांका गांधींचे मोठमोठे पोस्टर्स पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे प्रियांका गांधींच्या राजकीय इनिंगची भोपाळमधून सुरूवात होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.