जाहिरात
मराठी बातम्या / देश / बापरे...! घरात एकापाठोपाठ सापडले 21 नाग, गावकऱ्यांचा बसेना डोळ्यांवर विश्वास, Video

बापरे...! घरात एकापाठोपाठ सापडले 21 नाग, गावकऱ्यांचा बसेना डोळ्यांवर विश्वास, Video

घराच्या एका खोलीतून हे नाग एकामागून एक सरपटत बाहेर पडले.

घराच्या एका खोलीतून हे नाग एकामागून एक सरपटत बाहेर पडले.

घरात जी माणसं राहत होती त्यांच्याच सोबतीने ते वावरत होते, मात्र जमिनीखाली. त्यामुळे त्यांची कोणालाच कुणकुण नव्हती. आता पावसाळ्यात वाट शोधत हे नाग बिळाबाहेर पडले.

  • -MIN READ Local18 Basti,Uttar Pradesh
  • Last Updated :

कृष्ण गोपाल द्विवेदी, प्रतिनिधी बस्ती, 27 जुलै : काहीच दिवसांपूर्वी एका घराच्या सोफ्यात साप दडून बसल्याची बातमी समोर आली होती. तेव्हा घरातलं सर्व सामान वेळच्या वेळी स्वच्छ करा. घरात नीटनेटकेपणा ठेवा, असं आवाहन करण्यात आलं होतं. परंतु सामानाची साफसफाई करता येते, जमिनीचं काय? जमिनीखाली साप दडून बसला असेल तर? असा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेशच्या एका घरात एक नाही दोन नाही तब्बल 21 नाग आढळले. घराच्या एका खोलीतून हे नाग एकामागून एक सरपटत बाहेर पडले. त्या घरात जी माणसं राहत होती त्यांच्याच सोबतीने ते वावरत होते, मात्र जमिनीखाली. त्यामुळे त्यांच्याबाबत कोणालाच कुणकुण नव्हती. आता पावसाळ्यात वाट शोधत हे नाग बिळाबाहेर पडले.

News18लोकमत
News18लोकमत

मिळालेल्या माहितीनुसार, बस्ती जिल्ह्यातील रमवापूरमध्ये अली हुसैन नामक तरुणाच्या घरातील एका खोलीत नाग आढळला. नागाला पाहून त्याच्यासह कुटुंबीयांनी जोरात आरडाओरडा केला. आजूबाजूचे लोक जमल्यानंतर त्यांनी नागाला मारायचं ठरवलं. नागाशी सामना करायला सर्वांचेच हात-पाय थरथरत होते. मात्र सर्वांनी मोठ्या हिंमतीने त्याला ठेचून काढलं. एक नाग ठार होताच खोलीतून दुसरा नाग बाहेर पडला. भडकलेल्या गावकऱ्यांनी त्यालाही मारून टाकलं, मग तिसरा नाग बाहेर आला. आता गावकऱ्यांना थरकाप भरला. झोपेत डसतात, रक्ताच्या गुठळ्या करतात; भारतात आढळतात हे 13 विषारी साप मात्र हातात काठ्या होत्याच, तर त्यालाही मारून टाकलं. असं करता करता सात नाग ठार झाले. मात्र नागांची रांग काही थांबत नव्हती. गावकऱ्यांना घाम फुटला. लहान मुलं, वृद्ध माणसं, बायका आणि पुरुष असे घोळक्याने लोक जमा झाले. त्यांनी जराही वेळ न दवडता सर्पमित्रांशी संपर्क साधला. घडलेली घटना ऐकून सर्पमित्रही त्याठिकाणी तातडीने दाखल झाले. त्यांनी एकावेळी एकापाठोपाठ 12 नागांना ताब्यात घेतलं. या किळसवाण्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सर्पमित्र तिथून गेल्यानंतरही नाग बाहेर आले. गावकऱ्यांच्या माहितीनुसार, एकूण 21 नाग या खोलीत दडले होते. मात्र अजूनही नाग आत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून यामुळे परिसरात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. https://youtu.be/m1qu6cqvZ6I दरम्यान, नाग म्हणजेच कोब्रा ही सापांची अत्यंत धोकादायक प्रजाती आहे. नाग चावल्यानंतर काही वेळातच व्यक्तीची मज्जासंस्था काम करणं थांबवते आणि व्यक्तीला अर्धांगवायू होतो. नागमध्ये मज्जासंस्था आणि हृदयावर हल्ला करणारं विष असतं. या विषामुळे व्यक्तीची दृष्टीही कमी होऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात