उत्तर प्रदेश, 3 एप्रिल: महागड्या गाड्या (Car) आणि VIP नंबर (VIP Number) याकडे स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहिलं जातं. श्रीमंतीकडे आणि आपण कुणीतरी आहोत याकडे लक्ष वेधण्यासाठी हा अट्टाहास असतो. खरं तर महागडी गाडी विकत घेतल्यानंतर श्रीमंतीचं दर्शन होत असतं. यापुढे जात गाडीचा नंबरही तितकाच महत्त्वाचा असतो हे अधोरेखित होतं. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका VIP नंबरसाठी लाखो रुपयांची बोली लागल्याचं पाहायला मिळालं. VIP नंबरसाठी 1 लाखांपासून बोली सुरू झाली आणि ती 6 सहा लाखांपर्यंत पोहोचली.
उत्तर प्रदेश कार्यालयाकडून 27 मार्चपासून VIP नंबरसाठी ऑनलाइन लिलाव (Online Auction) करण्यात आला. हा लिलाव 2 एप्रिलपर्यंत सुरु होता. या लिलावात 'युपी 32 एमए 0001' या नंबरने लक्ष वेधून घेतलं. प्रवीण नावाच्या व्यक्तीने या नंबरसाठी 6 लाख 1 हजार रुपये मोजले आहेत. विशेष म्हणजे नंबर बुक करण्याऱ्या प्रवीण यांच्याकडे कोणतीही गाडी नाही. नंबर मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत त्यांना गाडी विकत घ्यावी लागणार आहे. अन्यथा नंबर बाद करून पैसेही परत मिळणार नाही. त्यामुळे गाडी नसताना या नंबरसाठी लाखोंची बोली लागल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या सहा लाखात आणखी एक गाडी विकत घेता येईल असं काहीचं म्हणणं आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशात एक व्हिआयपी नंबर 4 लाख 10 हजार रुपयांना विकला गेला होता.
आजार राहू दे पण इलाज आवर! Injection घेताना आजीबाईने दिली खतरनाक reaction, पाहा VIDEO
ऑनलाइन लिलावात आणखीही व्हिआयपी नंबरने लक्ष वेधून घेतलं. युपी एमए 9000 या नंबरसाठी एका गाडी मालकाने 50 हजार 500 रुपये मोजले. या व्यतिरिक्त 0707, 3232, 1818 आणि 2121 या गाडीच्या नंबरलाही चांगली किंमत मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.