Oxygen मिळेना, मुलीने तोंडाने दिला आईला श्वास, उत्तर प्रदेशमधला विदारक Video

Oxygen मिळेना, मुलीने तोंडाने दिला आईला श्वास, उत्तर प्रदेशमधला विदारक Video

Uttar Pradesh oxygen shortage अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी तडफडणाऱ्या रुग्णांसाठी नातेवाईकांचा जीव तुटत असल्याचे चित्र आहे. उत्तर प्रदेशातही स्थिती गंभीर आहे.

  • Share this:

लखनऊ, 2 मे : संपूर्ण देशात कोरोनाचं संकट (coronavirus) अत्यंत गंभीर बनत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता अनेक राज्यांच्या आरोग्य व्यवस्था कोलमडल्या आहेत. उत्तर प्रदेशातही (UP) रुग्णांचे प्रचंड हाल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. बहराइच मधल्या अशाच एका व्हिडिओनं (Behraich Viral Video) सध्या आरोग्य व्यवस्थेची अवस्था सर्वांसमोर आली आहे. आईला ऑक्सिजन मिळत नसल्याने (oxygen shortage) मुलीनं आईला स्वतः तोंडाद्वारे ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला (girl pumped mother with mouth) मात्र तरीही महिलेचा जीव वाचवणं शक्य झालं नाही.

(वाचा-Gold Price Today:आतापर्यंत 9463 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, पुढे काय असतील रेट)

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू होत असल्याच्या अनेक बातम्याही समोर येत आहेत. असाच एक व्हि़डीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे बहराईच येथील हॉस्पिटलमधला. याठिकाणी एका कोरोनाग्रस्त महिलेला ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून ती तडफडत होती. त्यावेळी तिच्या मुलीनं काहीही पर्याय समोर दिसेना म्हणून तोंडाने ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

(वाचा-West Bengal Result : ममतादीदींचा शानदार विजय, शरद पवारांनी केलं अभिनंदन, म्हणाले)

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशमधल्या आणि प्रामुख्याने बहराईचमधल्या या रुग्णालयाची काय अवस्था आहे हे समोर आलं आहे. या मुलीनं अनेक प्रयत्न करूनही ती आईला वाचवू शकली नाही. प्रत्यक्षात ऑक्सिजनचा एवढा तुटवडा असूनही प्रशासन सर्वकाही आलबेल असल्याप्रमाणे वागत आहे, त्यामुळं विरोधकांनी योगी सरकारला धारेवर धरलंय.

कोरोना रुग्णांचे ऑक्सिजन अभावी तडफडून मृत्यू होत असल्याच्या बातम्या यापूर्वीही समोर आल्या आहेत. या व्हायरल व्हिडिओमुळे पुन्हा एकदा त्याचीच चर्चा सुरू झाली आहे. पण केवळ ऑक्सिजन तुटवड्याची चर्चा किती दिवस करत राहणार. सरकार यावर मार्ग कधी काढणार असा सवाल आता विचारला जात आहे.

Published by: News18 Desk
First published: May 2, 2021, 3:43 PM IST

ताज्या बातम्या