नवी दिल्ली, 2 मे: सोने-चांदी (Gold Price Today) दरात मागील आठवड्यात सतत घसरण पाहायला मिळाली. या आठवड्यात सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1015 रुपयांपर्यंत घसरला आहे. तर चांदी 1352 रुपयांनी स्वस्त झाली आहे. या वर्षी आतापर्यंत सोनं 3411 रुपयांपर्यंत स्वस्त झालं आहे. त्याउलट चांदीचा दर 417 रुपयांनी वधारला आहे. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव गेल्या वर्षातील रेकॉर्ड दरावरुन 9463 रुपयांनी घसरला आहे. 21 एप्रिल रोजी सोन्याच्या दर 2 महिन्यांच्या रेकॉर्ड स्तरावर - वायदे बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमती 0.13 टक्के अधिक होत्या. म्हणजेच शुक्रवारी दर 46,785 प्रति 10 ग्रॅम इतका होता. त्याशिवाय चांदी 68,423 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी होती. 21 एप्रिल रोजी सोन्याचा दर दोन महिन्यांच्या रेकॉर्ड स्तरावर पोहचला होता. परंतु त्यानंतर दर पुन्हा घसरले. कोरोनाचा सोने दरावर परिणाम - भारतात सोन्याच्या किमतीवर 10.75 टक्के आयात शुल्क आणि 3 टक्के GST सामिल आहे. मुंबईतील एका डीलरने वृत्तसंस्था रॉयटरशी बोलताना सांगितलं, की ‘भारतात जवळपास प्रत्येक राज्याने कोणत्या ना कोणत्या प्रकारचे कोरोना प्रतिबंधात्मक नियम लावले आहेत. त्यामुळे सोन्याची दुकानं बंद आहेत किंवा कमी प्रमाणात सुरू आहेत. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे.’
(वाचा - तुम्ही Oximeter चा चुकीचा वापर तर करत नाही ना? केंद्राने सांगितली योग्य पद्धत )
मार्चमध्ये कशी होती मागणी - वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने सांगितलं, की या जून तिमाहीमध्ये, लॉकडाउनमुळे भारतात सोन्याचा वापर अपेक्षित आहे. मार्च तिमाहीमध्ये भारतात सोन्याच्या मागणीत 37 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलनुसार (WGC), मौल्यवान धातूच्या दरातील घसरणीमुळे मागणीत वाढ होत असल्याचं सांगण्यात आलं आहे.