मुंबई, 2 मे : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल (West Bengal Assembly Election Result) जवळपास पूर्णपणे स्पष्ट झाले आहेत. सत्तेचा दावा करणाऱ्या भाजपला (BJP) पराभूत करत ममता बॅनर्जींनी (Mamata Banerjee) तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं ममता दीदींवर पुन्हा अभिनंदनाचा वर्षाव होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar congratulate Mamata Banerjee) यांनीही ममतादीदींना या विजयानंतर अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. (वाचा- West Bengal Election Results 2021 :…पण बंगालच्या जनतेनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं, खडसेंचा टोला ) ममता बॅनर्जींचे अभिनंदन करताना शरद पवार यांनी म्हटले की, पश्चिम बंगालमध्ये मिळवलेल्या या विलक्षण विजयाबद्दल ममता दीदी आपले अभिनंदन. या विजयासह अभिनंदन करतानाच पवार म्हणाले की, लोकांच्या कल्याणासाठी आपण करत असलेले आपले काम असेच सुरू ठेवूयात. त्याचबरोबर कोरोनाच्या महामारीचा एकत्रितपणे सामना करुयात असंही शरद पवारांनी ममता दीदींनी अभिनंदन करण्यासाठी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Congratulations @MamataOfficial on your stupendous victory!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 2, 2021
Let us continue our work towards the welfare of people and tackling the Pandemic collectively.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना शरद पवारांनी पाठिंबा दर्शवला होता. विशेष म्हणजे ममता बॅनर्जींच्या प्रचारासाठी शरद पवार हे पश्चिम बंगालमध्ये जाणारही होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्यांना प्रचाराचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. ममता बॅनर्जींनी भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याची विनंती केली होती. शरद पवारांनी त्याला सक्रिय प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता शरद पवारांनी ममता दीदींच्या विजयावर त्यांचं अभिनंदनही केलं आहे. (वाचा- पंढपुरात भाजपची मोठी आघाडी, 25 फेऱ्यापर्यंतची संपूर्ण आकडेवारी ) पश्चिम बंगालमध्ये भाजप ममता बॅनर्जींना सत्तेवरून पायउतार करणार असा दाव करत असतानच तृणमूल काँग्रेसनं मात्र सत्ता राखण्यात यश मिळवल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम बंगालच्या निकालाचे आकडे पाहता गेल्या वर्षीपेक्षाही ममता जास्त जागा मिळवण्याची देखिल शक्यता नाकारता येत नाही. गेल्यावेळी ममता बॅनर्जींच्या तृणमूलने पश्चिम बंगालमध्ये 209 जागा जिंकल्या होत्या.