मराठी बातम्या /बातम्या /देश /

महाराष्ट्र कोणी विकत घेतला नाही! राज ठाकरेंनी जिभेला आवर घालावा; योगींच्या मंत्र्याचं आव्हान

महाराष्ट्र कोणी विकत घेतला नाही! राज ठाकरेंनी जिभेला आवर घालावा; योगींच्या मंत्र्याचं आव्हान

Raj Thackeray Ayodhya Visit: राज ठाकरे काही महिन्यांपूर्वी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, तेथील भाजप खासदाराने राज यांना अयोध्येत येण्यास विरोध केला होता. आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील मंत्र्याने राज ठाकरे यांना आव्हान दिलं आहे.

पुढे वाचा ...
    अयोध्या, 23 जुलै : काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला होता. यामुळे ऐनवेळी राज यांना माघार घेत दौरा रद्द करावा लागला होता. आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांना भाजपच्या मंत्र्यानं आव्हान दिलं आहे. रामाच्या दर्शनाला कोणीही येऊ शकतो. मात्र, देशात अरेरावीची भाषा वापरू नये. हिंदुस्थान सर्वांचा आहे. कोणा राजकारण्याने विकत घेतलेला नाही. महाराष्ट्र देखील कोणी विकत घेतलेला नाही. ही लोकशाही आहे, राजेशाही नाही. लोकसेवकांनी अशा भाषेच्या मर्यांदांचे पालन करायला हवे, असा सल्ला उत्तर प्रदेशचे मंत्री ठाकुर रघुराज सिंह यांनी दिला आहे. काय म्हणाले मंत्री ठाकुर रघुराज सिंह? राज ठाकरे यांना मी विनंती करेन की, तुम्ही तुमच्या जिभेला आवर घालावा. उत्तर भारतीय काही पाकिस्तानी नाहीत. उत्तर भारतानेच जगावर राज्य केलं आहे. भगवान राम, कृष्ण महाराष्ट्रात कुठे जन्माला आलेत ते सांगावं. महाराष्ट्र संतांची भूमी आहे हे मान्य. पण, हे देव उत्तर भारतातच जन्माला आले. आराध्य देव जिथे जन्मले तिथे तुम्ही जात असाल तर आम्ही रोखणार नाही, असे मंत्री ठाकुर रघुराज सिंह यांनी म्हटले आहे.

    शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरें इतका अन्याय दुसरा कोणीच केला नाही - शरद पवार

    ..म्हणून आम्ही महाराष्ट्रात कार्यालय खोललं :  मंत्री ठाकुर रघुराज सिंह महाराष्ट्रातून गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेली जात असल्याच्या आरोपावर देखील सिंह यांनी उत्तर दिले आहे. आम्ही ज्यांना सुविधा देणार ते येतील. भारताच्या बाहेर थोडीच जात आहेत. आम्ही या सुविधा देण्यासाठी कार्यालय खोलले आहे. तुम्ही सुविधा देणार नाही, आमच्याकडेही येऊ देणार नाही, असे थोडीच होणार आहे, असा सवालही त्यांनी केला. एनबीटीला त्यांनी ही मुलाखत दिली आहे. त्यावेळी अचानक दौरा रद्द उत्तर प्रदेशात बाहुबली अशी ओळख असणारा नेता म्हणजे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh) यांनी काही दिवसांपूर्वी थेट राज ठाकरेंना (Raj Thackeray) आव्हान दिलं होतं. अयोध्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) धरतीवर पाय न ठेवू देण्याचा निर्धार त्यांनी केला होता. यावरून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील राजकारण तणावपूर्ण झाले होते. दौऱ्याआधीच राज ठाकरेंनी प्रकृतीच्या कारणावरून दौरा पुढे ढकलणार असल्याचे जाहीर केले होते.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Ayodhya, Raj thackarey

    पुढील बातम्या