पुणे, 23 जुलै : प्रा. श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचं प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात पार पडलं. कोल्हापूरचे छत्रपती शाहु महाराज कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. आजवर शिव छत्रपतींवर जे लिखाण केलं गेलं त्यात काही ठिकाणी सत्याचा आधार आहे, काही ठिकाणी मात्र अतिशयोक्ती आहे. तर काही ठिकाणी धादांत खोटं सांगितलं गेलं आहे. श्रीमंत कोकाटे यांनी सत्याच्या आधारावर हे पुस्तक लिहिलं आहे. शिवछत्रपतींचे राज्य हे कधी भोसलेंचं राज्य झालं नाही, ते रयतेच राज्य झालं. शिव छत्रपतींविषयी धर्मांध विचार मांडण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. तो कसा चुकीचा आहे ते श्रीमंत कोकाटे यांनी सदोहरण स्पष्ट केलं. रायगडावरील शिव छत्रपतींची समाधी महात्मा फुले यांनी शोधली. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती असा न करता कुळवाडी भूषण असा केला. बाबासाहेब पुरंदरे यांचं लिखाणाइतका शिवछत्रपतींवर अन्याय कोणी केला नाही, असं माझं मत आहे. शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला. अन्य घटकांचं महत्व वाढवण्याचे काम त्यांनी केलं. रामदासांचे योगदान काय, दादोजी कोंडदेवांचे योगदान काय? शिवाजी महाराजांना ज्यांनी दिशा दिल्या त्या फक्त जिजाऊ होत्या. सत्य गोष्टी अनेकांना न पटणाऱ्या आहेत. त्यांच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. सत्यावर आधारित, नव्या पिढीला मार्गदर्शन ठरणारा वास्तव इतिहास आपल्याला पाहिजे. त्यासाठी संशोधकांनी एकत्र यावे. संसदेचे अधिवेशन झाल्यावर आपण भेटू. ज्यांची हत्या झाली त्या गोविंद पानसरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर उत्तम लिखाण केलं. एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेवर पवार म्हणाले… सुरक्षा द्यायचा निर्णय कॅबिनेट घेत नाही. सिनियर अधिकारी निर्णय घेतात. ते म्हणाले शिंदेंना झेड सिक्युरिटी होती. ॲडिशनल फोर्स होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.