पंजाब, 10 मार्च : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या (Punjab Assembly Election) मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांनुसार पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली आहे.
आत्ताच्या ट्रेंडनुसार, 117 जागांपैकी तब्बल 86 जागांवर आम आदमी पक्षाने आघाडी घेतली आहे. काँग्रेस 16, अकाली दल 9 जागांवर, भाजप 2 तर अपक्ष एका जागेवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा झटका बसला असल्याचं दिसत आहे. तर आम आदमी पक्षाने मुसंडी मारत इतरांना क्लीन स्विप दिल्याचं बोललं जात आहे.
सोनू सूदची बहिण मालविका पिछाडीवर
अभिनेता सोनू सूद (Actor Sonu Sood) याची बहिण मालविका (Malvika Sood) मोगा विधानसभा मतदारसंघातून (Moga Assembly) निवडणुकीच्या रिंगणात होती. काँग्रेस उमेदवार असलेली मालविका सध्या पिछाडीवर असल्याचं दिसून येत आहे. मोगा विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या 15 विधानसभेच्या निवडणुकांपैकी एकूण 10 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. 1977 ते 2017 या काळात काँग्रेस पक्षाने या मतदारसंघातून एकूण सहा वेळा विजय मिळवला होता.
आप सत्ता स्थापन करणार?
आत्तापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला सर्वाधिक जागांवर आघाडी मिळाली आहे. ही आघाडी पाहता पंजाबमध्ये आम आदमी पक्ष एक हाती सत्ता स्थापन करणार असल्याचं दिसून येत आहे.
Exit Polls नुसार पंजाबमध्ये केजरीवालांचं सरकार
इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार, आम आदमी पक्षाला सर्वाधिक मतदान झालं आहे. पंजाबध्ये 117 विधानसभेसाठी निवडणूक झाल्या असून विजयासाठी 59 जागा आवश्यक आहे.
काँग्रेस - 19-31 (जागा येण्याची शक्यता)
अकाली दल - 7-11
आप - 76-90
AXIS-My India च्या Exit Polls नुसार...
काँग्रेस - 19-31
आप - 79-90
अकाली दल - 11+
ETG Research च्या Exit Polls नुसार...
काँग्रेस - 27-23
आप - 70-75
अकाली दल - 7-13
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aam aadmi party, Assembly Election, Punjab, Sonu Sood, काँग्रेस