उत्तर प्रदेश, 31 डिसेंबर: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठ जिल्ह्यातून (Meerut district) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर नववधू सासरच्या घरी पोहोचली तेव्हा मधुचंद्राच्या रात्री तिच्या पोटात दुखू लागले. नववधूच्या (Bride) पोटात (Stomach) अचानक दुखू लागल्याने पतीला टेश्नन आलं. तो चिंतेत पडला. त्याला तातडीनं वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी पोट दुखत असल्यानं नववधूची तपासणी केली. तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली. तपासाअंती डॉक्टरांनी नवऱ्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना जे सांगितले ते ऐकून जणू त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांनी सांगितले की वधू पाच महिन्यांची गरोदर आहे आणि गर्भात दोन गर्भ वाढत आहेत. त्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर नवरा आणि त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला. त्यानंतर नवऱ्याच्या बाजूने फसवणूकीचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. हेही वाचा- महाराष्ट्रात Lockdown लागणार?, मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत साडेतीन तास बैठक खारखोडा येथील पिपलीखेडा येथील रहिवासी असलेल्या तरुणाचा विवाह 25 डिसेंबर रोजी लिसाडी गेट येथे राहणाऱ्या तरुणीसोबत झाला होता. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी तरुण वधूसोबत त्याच्या घरी पोहोचला. रात्री नववधूनं पोटदुखीची तक्रार केली. त्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला रुग्णालयात नेलं. स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयात तिची तपासणी केली असता ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. अल्ट्रासाऊंड केले असता गर्भात दोन गर्भ असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. नववधूच्या कुटुंबीयांना हा संपूर्ण प्रकार सांगितला आणि त्यानंतर दोन्ही कुटुंबियांमध्ये वाद झाला. दोन्ही पक्षांमध्ये पंचायतही झाली. 10 लाखांची केली मागणी तरणाच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुटुंबियांवर आधी फसवणूक करून लग्न लावून दिल्याचा आरोप केला आहे. तसंच आता घटस्फोटासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली आहे. यानंतर गुरुवारी तरुणाने एसएसपी मेरठ कार्यालयात तक्रार दाखल केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.