मराठी बातम्या /बातम्या /देश /Cold Drink मधून गुंगीचं औषध देऊन विद्यार्थिंनीला दिल्या नरकयातना, मित्रांनी बनावला VIDEO

Cold Drink मधून गुंगीचं औषध देऊन विद्यार्थिंनीला दिल्या नरकयातना, मित्रांनी बनावला VIDEO

मेडिकल करून पीडितेचा जबाब न्यायालयात नोंदवण्यात आला आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले.

मेडिकल करून पीडितेचा जबाब न्यायालयात नोंदवण्यात आला आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले.

मेडिकल करून पीडितेचा जबाब न्यायालयात नोंदवण्यात आला आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले.

उत्तर प्रदेश, 25 डिसेंबर: उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये (Bijnor)कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून एका विद्यार्थिंनीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची घटना समोर आली आहे. जिथे BAMS च्या एका विद्यार्थिनीने आरोप केला आहे की तिच्या मित्राचा भाऊ आणि त्याच्या साथीदाराने कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिचा व्हिडिओ बनवला. मेडिकल करून पीडितेचा जबाब न्यायालयात नोंदवण्यात आला आहे.

घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथकं तैनात केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बिजनौरमध्ये BAMS करत असलेल्या विद्यार्थिनीला बर्थडेच्या पार्टीला घेऊन जात असल्याचं असे सांगून नगीना येथील एका हॉटेलमध्ये नेण्यात आले. जिथे उमेर आणि अब्दुल यांनी कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून सामूहिक बलात्कार केला.

हेही वाचा- News: लुधियाना Blast प्रकरणातल्या मास्टरमाईंड संदर्भात मोठी बातमी

तक्रारीत पीडित तरुणीनं म्हटलं की, दोन्ही मुलांनी तिला कोल्ड्रिंक पाजलं. त्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि शुद्धीवर आल्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याचं समजलं. त्यांनी तिचा व्हिडिओही बनवला. महिलेनं सांगितलं की, दोन्ही आरोपींनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​तिला मारहाण करून तिच्याकडून पैसे काढून घेतले आणि रात्री उशिरा रस्त्यात सोडून दिलं. पीडित विद्यार्थिनीनं पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध एससी/एसटी कायदा आणि सामूहिक बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस उपअधीक्षक कुलदीप गुप्ता यांनी सांगितले की, मुलगी बिजनौरच्या वसतिगृहात राहून बीएएमएस कोर्स करत आहे.

हेही वाचा-  वाह..! दहशतवाद्यांविरोधात शोपियानमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई

पीडित विद्यार्थिनीची मेडिकल तपासणी करुन स्लाइड चौकशीसाठी पाठवण्यात आली आहे. पीडितेचा जबाब न्यायालयात नोंदवण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेसाठी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपअधीक्षकांनी दिली.

First published:
top videos

    Tags: Gang Rape, Uttar pradesh news