श्रीनगर, 25 डिसेंबर: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) शोपियान जिल्ह्यातील (Shopian district) चौगाम भागात शनिवारी सकाळी दहशतवादी (Terrorists) आणि सुरक्षा दलांमध्ये (security forces) चकमक झाली. या चकमकीत लष्कर ए तैयबाचे (Lashkar-e-Taiba) दोन दहशतवादी ठार झाले आहेत. तसेच शस्त्रास्त्र आणि दारूगोळा यासह आपत्तीजनक साहित्य जप्त करण्यात आलं आहे. चौगाममध्ये (Chaugam) झालेल्या चकमकीत लष्कर ए तैयबाचे दोन दहशतवादी मारले गेल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिपोरा येथील सज्जाद अहमद चेक, शोपियान आणि आचन पुलवामाचा राजा बासित नाझीर अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. त्याचवेळी काश्मीर झोन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शोध मोहीम अजूनही सुरू आहे.
हेही वाचा- IT चा सर्वात मोठा छापा, अत्तर व्यापाऱ्याच्या घरात सापडलं 177 कोटींचं घबाड
याआधी काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, शोपियानच्या चौगाम भागात चकमक सुरू झाली आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती.
#Encounter has started at Chowgam area of #Shopian. Police and security forces are on the job. Further details shall follow. @JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) December 24, 2021
त्यांनी सांगितलं की, यावेळी परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर देत गोळीबार केला. अधिकाऱ्यानं सांगितलं की, चकमक अजूनही सुरू आहे आणि तपशीलवार माहिती अजून आलेली नाही.
पोलीस, सुरक्षा दलांव्यतिरिक्त नागरिकही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर
याआधी शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील मुमनहाल (अरवानी) परिसरात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी मारला गेला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये एका अज्ञात दहशतवाद्याचा खात्मा केल्याचं म्हटलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईदरम्यान एक एके-47 रायफलही जप्त करण्यात आली आहे.
हेही वाचा- अजब! तीन महिन्यांनंतर 'मृत' पती सापडला 'जिवंत', धक्कादायक कारण आलं समोर
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दहशतवादी सातत्याने सर्वसामान्यांना लक्ष्य करत आहेत. तर पोलीस कर्मचाऱ्यांवरही हल्ले करत आहेत. काश्मीर खोऱ्यात बुधवारी झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला.
याआधी दहशतवादी ठार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना श्रीनगरच्या नवाकदलमध्ये घडली आहे. जिथे दहशतवाद्यांनी स्थानिक रहिवाशाला लक्ष्य करून त्याची हत्या केली. दुसरीकडे, दुसरा हल्ला दक्षिण काश्मीरमध्ये झाला असून त्यात एक ASI गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी रात्री उशिरा कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी गावात दहशतवाद्यांची उपस्थिती असल्याची माहिती मिळाली. या आधारे तत्काळ कारवाई करत, एसओजीने लष्कराच्या एका राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या 188 बटालियनसह परिसराची नाकेबंदी करून शोध मोहीम सुरू केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.