Home /News /national /

जगाला धडकी भरविणारी ही हेलिकॉप्टर्स भारत घेणार, 21 हजार कोटींचा करार

जगाला धडकी भरविणारी ही हेलिकॉप्टर्स भारत घेणार, 21 हजार कोटींचा करार

अत्याधुनिक रडार यंत्रणाही भारताला देण्यासाठी अमेरिका इच्छुक आहे. मात्र भारत त्यासाठी राजी झालेला नसून अशी यंत्रणा रशिया भारताला देणार आहे.

    नवी दिल्ली 25 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज चर्चा झाली. त्यात अपेक्षेप्रमाणं संरक्षण करारावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. हैदराबाद हाऊसमध्ये दोन्ही नेते आणि शिष्टमंडळांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर ट्रम्प आणि मोदी यांनी पत्रकारांपुढे संयुक्त निवेदन दिलं. त्याच बरोबर दोन्ही देशांमध्ये पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारत आणि अमेरिकेदरम्यानचा हा सर्वात मोठा संरक्षण करार आहे. या करारामुळे भारताची संरक्षण क्षमता वाढणार असून अमेरिकेलाही मोठा आर्थिक फायदा होणार आहे. यावेळी बोलताना ट्रम्प म्हणाले, भारतातल्या स्वागताने मी भारावून गेलो आहे. माझ्यासाठी आणि मेलेनियासाठी हा दौरा संस्मरणीय ठरला आहे. या भेटीमुळे दोन्ह देशांचे संबंध नव्या उंचीवर गेल्याचंही त्यांनी सांगितलं. तर भारत आणि अमेरिकेतल्या मैत्रीचं नवं पर्व सुरू झाल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. या संरक्षण करारामुळे भारत अमेरिकेकडून 6 AH-64E अपाचे आणि 'MH60 रोमियो' ही दोन अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स अमेरिकेकडून भारताला मिळणार आहे. हा 21 हजार कोटींचा करार असला तरी याच खरेदीवर तब्बल 18 हजार कोटी खर्च होणार आहेत. तर अत्याधुनिक रडार यंत्रणाही भारताला देण्यासाठी अमेरिका इच्छुक आहे. मात्र भारत त्यासाठी राजी झालेला नसून अशी यंत्रणा रशिया भारताला देणार आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान 3 सामंज्यस्य करार (MoU ) करण्यात आले. 1. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात सहकार्य आणि संशोधन 2. वैद्यकीय उपकरणांची सुरक्षितता 3. दोन्ही देशांमधल्या बड्या तेल कंपन्यांमध्ये सहकार्य
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Donald Trump, Narendra modi

    पुढील बातम्या