व्याजदरात वाढ का?
अमेरिकन फेडरल बँकेनं सलग दुसऱ्या महिन्यात व्याजदरात वाढ केली आहे. या व्याजदरवाढीचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो अशीही शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेत सध्या महागाईनं उच्चांक गाठला आहे. त्यामुळे फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वेगानं वाढणाऱ्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी फेडरल रिझर्व्ह बँकेनं एकरकमी व्याजदरात तीन चतुर्थांश वाढ केली आहे.
हेही वाचा - Corona vaccination मध्ये चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! कोव्हिड लस देताना सर्वात मोठी चूक; VIDEO VIRAL
भारतावर काय परिणाम?
अमेरिकेत होणाऱ्या आर्थिक निर्णयांचे परिणाम जगभरावर होत असतातच. त्यात आता अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेनं केलेल्या या व्याजदराचे परिणाम भारतावरही वाईट परिणाम होऊ शकतील, असा अंदाज आहे. खरं तर पुढच्या महिन्यात 5 ऑगस्ट रोजी आरबीआयनं आर्थिक पुनरावलोकनासाठी बैठक आयोजित केली आहे. त्याचवेळेस फेडरल रिझर्व्ह बँकेप्रमाणे आरबीआयही व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते, असं बोललं जात आहे.
आरबीआयनंही (RBI) सलग दोनदा व्याजदरात वाढ केली आहे. जूनमध्ये झालेल्या बैठकीत आरबीआयनं रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेतला होता. याहीवेळेस आरबीआयनं रेपो रेट वाढवला तर बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सर्व कर्जांमधील व्याजदरांतही वाढ होईल. होम लोन, पर्सनल लोनसारखी कर्ज महाग होतील. कर्जांवरील व्याज वाढल्यानं साहजिकच त्याच्या हप्त्यांमध्ये म्हणजे EMI मध्ये वाढ होईल. यामुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागणार आहे. त्याचं महिन्याचं बजेट कोलमडू शकतं.
हेही वाचा - देशात बेरोजगारीचं भीषण वास्तव; 1000 मधून फक्त 3 जणांना मिळते सरकारी नोकरी; गेल्या 8 वर्षांत बिकट स्थिती
1994 नंतरचे सर्वांत जास्त व्याजदर
दुसरीकडे अमेरिकेतील वाढती महागाई हा जगभरातील अर्थतज्ज्ञांसाठी चिंतेचा विषय आहे. अमेरिकेत 1994 नंतर आता व्याजदरांनी उच्चांक गाठला आहे. हे दर गेल्या 18 वर्षांतील उच्चांकी दर आहेत. गेल्या महिन्यातही फेडरल रिझर्व्ह बँकेनं व्याजदरांत 0.75 टक्क्यांची वाढ केली होती. अमेरिकन फेडरल बँकेनं गेल्यावेळेस जून आणि यावेळेस जुलैमध्ये अशा सलग दोन महिन्यांत 07.75 टक्क्यांपर्यंत व्याजदरवाढ केली होती. याशिवाय या वर्षी आतापर्यंत चौथ्यांदा व्याजदर वाढवले आहेत. आता याचे परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर आणि भारतावर कसे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Economy, Financial benefits, Rbi