मराठी बातम्या /बातम्या /Viral /Corona vaccination मध्ये चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! कोव्हिड लस देताना सर्वात मोठी चूक; VIDEO VIRAL

Corona vaccination मध्ये चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! कोव्हिड लस देताना सर्वात मोठी चूक; VIDEO VIRAL

लहान मुलांच्या कोरोना लसीकरणातील बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

लहान मुलांच्या कोरोना लसीकरणातील बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

लहान मुलांच्या कोरोना लसीकरणातील बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Viralimalai, India

रचित दुबे/भोपाळ, 28 जुलै : लहान मुलांच्या कोरोना लसीकरणासंबंधी एका बातमीने खळबळ उडवली आहे. लहान मुलांच्या कोरोना लसीकरणात सर्वात मोठी चूक झाली आहे. कोरोना लसीकरणातील बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामुळे आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाचीही झोप उडाली आहे. यानंतर तात्काळ तपास आणि कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील जैन पब्लिक स्कूलमधील ही घटना.  तब्बल 30 मुलांना एकाच सुईने लस टोचण्यात आली आहे. लस देण्यासाठी डिस्पोजेबल सीरिंज वापरल्या जात आहेत. ज्या एकदाच वापरल्या जातात. नंतर त्या फेकल्या जातात. असं असताना इथल्या लसीकऱण केंद्रावर लस देणाऱ्या नर्सिंग विद्यार्थ्याने मुलांना एकाच सीरिंजने लस दिली.

शालेय मुलांसाठी असलेल्या शाळेतील कोरोना लसीकरण कॅम्पमध्ये खासगी नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचीही ड्युटी लावण्यात आली होती. त्याने एकामागो एक तब्बल 30 मुलांना लस दिली पण या तीसही लशी त्याने एकाच सीरिंजने दिल्या. लसीकरण करताना एका मुलाच्या वडिलांचं तिथं लक्ष गेलं आणि हा प्रकार उघडकीस आला.

हे वाचा - लेट झाला म्हणून विद्यार्थ्यांना साफ करायला लावलं टॉयलेट; शाळेतील संतापजनक VIDEO VIRAL

जैन पब्लिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे वडील दिनेश नामदेव यांनी सांगितलं की, लसीकरणादरम्यान मी एकाच सीरिंजने सर्व मुलांना लसीकरण केलं जात असल्याचं पाहिलं. मी लस देणाऱ्या विद्यार्थ्याला याचं कारण विचारलं तेव्हा त्याने एचओडी सरांनी एकाच सीरिंजने सर्वांना लस द्यायला सांगितल्याचं सांगितलं.

नर्सिंग स्टुडंसला असं करताना पाहून पालकांनी त्याला जाब विचारला. त्याचा व्हिडीओही रेकॉर्ड केला. जो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात त्याने आपलं नाव जितेंद्र असं सांगितलं आहे. व्हिडीओ तो सांगतो. त्याला एकच सीरिंज देण्यात आली होती आणि याच सीरिंजने सर्व मुलांना लस द्यायला सांगितलं होतं. आपल्याला जे सांगण्यात आलं ते आपण केलं, यात माझी काय चूक? असं हा विद्यार्थी बोलतो.

हे वाचा - 'मी वैतागलो आहे, या जगातून जाणार', चिमुकल्याचा VIDEO होतोय VIRAL

या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. सीएमएचओ डॉ. डी.के. गोस्वामी तात्काळ शाळेत पोहोचले आणि प्रकरणाची तपासणी सुरू केली. गोस्वामी म्हणाले, कोरोना लसीकरणातील हलगर्जीपणा समोर आला आहे. याचा तपास केला जातो आहे. याबाबत कारवाई केली जाईल.  तर दुसरीकडे लस देणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांचाही बेजबाबदारपणा समोर आला आहे. त्यांच्याही चौकशी होऊ सकते.  जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाबाबत समजल्यानंतर त्यांनी मुख्य आरोग्य अधझिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

First published:
top videos

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Vaccination, Vaccine