Home /News /national /

खळबळजनक! अमेरिकेनं भारतात पाठवलेल्या 167 लोकांमध्ये अल कायदाचा दहशतवादी

खळबळजनक! अमेरिकेनं भारतात पाठवलेल्या 167 लोकांमध्ये अल कायदाचा दहशतवादी

अमेरिकेनं 19 मे रोजी 167 भारतीयांना खास विमानाने अमृतसरला पाठवलं होतं. यातील एका प्रवाशाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    अमृतसर, 21 मे : अमेरिकेनं 19 मे रोजी 167 भारतीयांना खास विमानाने अमृतसरला पाठवलं होतं. यामधील एक प्रवासी इब्राहिम जुबेर मोहम्मद हा अल कायदाचा दहशतवादी असल्याचं समोर आलं आहे. जुबैर मोहम्मद हा दहशतवादी संघटनेच्या फायनान्स विंगचे काम बघत होता. व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या जुबेरला दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल अमेरिकेनं दोषी ठरवलं आहे. भारतातील 167 लोक जे अमेरिकेत बेकायदेशीर वास्तव्य करत होते त्यांना अमेरिकेनं खास विमानातून अमृतसर इथं पाठवलं होतं. हे लोक अमेरिकेत बेकायदा राहत होते. अमेरिकेत त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांची रवानगी अमेरिकेनं केली होती. यात इब्राहिम जुबेरचासुद्धा समावेश होता. दरम्यान या प्रकरणी अमृतसर पोलीस कमिश्नर सुखचैन सिंग गिल यांनी सांगितले की, इब्राहिमच्या भूतकाळाबद्दल किंवा त्याच्या हिस्ट्रीबाबत काही माहिती नाही. इतर नागरिकांप्रमाणे त्यालाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तर सिव्हिल सर्जन जुगल किशोर यांनी सांगितलं की, इब्राहिम जुबेर मोहम्मद नावाच्या आरोपीला क्वारंटाइन केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार 19 मे रोजी अमेरिकेतून परत आलेल्या भारतीयांच्या यादीत इब्राहिम मोहम्मदचे नाव 163 नंबरला आहे. मूळचा हैद्राबादचा असलेला इब्राहिम 2001 मध्ये भारत सोडून अमेरिकेत गेला होता. तिथे त्याचं शिक्षण सुरू असताना दहशतवादी संघटना अल कायदाच्या संपर्कात आला. हे वाचा : झोपेत असताना मित्राच्या डोक्यात घातला दगड, धक्कादायक कारण समोर इब्राहिम अरब देशांमध्येही फिरला आहे. 2006 मध्ये त्याने अमेरिकन तरुणीशी लग्न केलं होतं. दरम्यान, अमेरिकन सरकारला इब्राहिम हा अल कायदामध्ये असल्याचं समजलं. त्यानंतर त्याला दोषीही ठरवण्यात आलं होतं. हे वाचा : थंडीत कोरोना पुन्हा वाढल्यास दुहेरी संकट, अमेरिकन तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: India

    पुढील बातम्या