सांगोला, 21 मे : सांगोला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोबाईल घेण्याच्या कारणावरुन चिडून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाला. ही घटना बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. अण्णा मोहन साखरे (वय 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत अण्णा साखरे आण आरोपी किरण कोळी हे दोघेही दिवसभर सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मिळून मोल मजुरीची कामे करतात. मंगळवार 19 मे 2020 रोजी रात्री दोघांनी मद्यप्राशन केले. यावेळी अण्णा साखरे याने किरण कोळीचा मोबाईल घेतला असता त्याने मोबाईल परत मागितला. यावेळी अण्णा साखरे याने त्याला 500 रुपये दे नाही तर काय करायचे ते कर असे म्हणाला. वाद झाल्यानंतर दोघेही मार्केट यार्डात झोपले. पहाटेच्या सुमारास झोपेत असतानाच किरण कोळी याने अण्णा साखरेच्या डोक्यात दगड घातल्याने तो जागीच मृत्यूमुखी पडला. याबाबत पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. हेही वाचा - पुण्याचा प्रवास पडला महागात, पोलीस पाटलाविरोधात पोलीस अधिकाऱ्यानेच दिली फिर्याद घटनेनंतर किरण कोळी पहाटे साडे सहाच्या सुमारास स्वत:हून पोलीस स्टेशनला हजर झाला. याबाबत सांगोला पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.