मराठी बातम्या /बातम्या /देश /Urvashi Yadav Life Story: तिच्यातील 'अन्नपूर्णे'मुळं घरात आली लक्ष्मी! छोले-कुलचे विकून मिळवलं गमावलेलं वैभव

Urvashi Yadav Life Story: तिच्यातील 'अन्नपूर्णे'मुळं घरात आली लक्ष्मी! छोले-कुलचे विकून मिळवलं गमावलेलं वैभव

एखादी स्त्री कितीही संकट आलं तरी क्षणभर खचेल पण हार मानत नाही. ती कुटुंबाला सर्वतोपरी आधार देण्यासाठी, कुटुंबाच्या सुखासमाधानासाठी प्रसंगी जीवाचं रान करते. उर्वशी यादव (Urvashi Yadav Life Story) यांची कहाणी काहीशी अशीच आहे.

एखादी स्त्री कितीही संकट आलं तरी क्षणभर खचेल पण हार मानत नाही. ती कुटुंबाला सर्वतोपरी आधार देण्यासाठी, कुटुंबाच्या सुखासमाधानासाठी प्रसंगी जीवाचं रान करते. उर्वशी यादव (Urvashi Yadav Life Story) यांची कहाणी काहीशी अशीच आहे.

एखादी स्त्री कितीही संकट आलं तरी क्षणभर खचेल पण हार मानत नाही. ती कुटुंबाला सर्वतोपरी आधार देण्यासाठी, कुटुंबाच्या सुखासमाधानासाठी प्रसंगी जीवाचं रान करते. उर्वशी यादव (Urvashi Yadav Life Story) यांची कहाणी काहीशी अशीच आहे.

    गुरुग्राम, 27 ऑक्टोबर: प्रत्येक स्त्री- मग ती आई, बहीण किंवा पत्नी असो ती तिच्या कुटुंबाचा प्रमुख आधार असते. मुळातच कणखर आणि कष्टाळू अशी स्वभाव वैशिष्ट्ये असलेली स्त्री कितीही संकट आलं तरी क्षणभर खचेल पण हार मानत नाही. ती कुटुंबाला सर्वतोपरी आधार देण्यासाठी, कुटुंबाच्या सुखासमाधानासाठी प्रसंगी जीवाचं रान करते. उर्वशी यादव (Urvashi Yadav Life Story) यांची कहाणी काहीशी अशीच आहे. गुरुग्राम (Gurugram Inspirational Story) येथील उर्वशी यादव यांना कधीकाळी अत्यंत कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. एकवेळ अत्यंत सुखवस्तु जीवन अनुभवलेल्या उर्वशी यांना कठीण प्रसंगांचा सामना करताना कडक उन्हात रस्त्यावर उतरून काम करावं लागलं. मात्र त्यांनी हार मानली नाही. कुटुंबाचं गेलेलं वैभव त्यांनी कठोर परिश्रमांतून परत मिळवलंच परंतु, त्यासोबत प्रसिद्धीदेखील मिळवली. आज त्यांनी केलेलं काम हेच त्यांची ओळख बनलं आहे.

    सध्या उर्वशी यादव हे गुरुग्राममध्ये अत्यंत नावाजलेलं व्यक्तिमत्त्व. त्यांच्या हातच्या छोले-कुलच्याची चव अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे. विशेष म्हणजे ही चव आजही अनेक जण अनुभवत आहेत. पण एक काळ असा होता की उर्वशी यादव या अत्यंत सुखवस्तु जीवन जगत होत्या. गुरुग्राममध्ये त्यांचं कोट्यावधी रुपयांचं घर होतं. पण एका प्रसंगानं त्यांचं हे सुख हिरावून नेलं आणि त्यांना कुटुंबाच्या चरितार्थासाठी रस्त्याच्या कडेला छोले-कुलचे विक्रीची (Small Business by Gurugram Woman) गाडी सुरू करावी लागली. कधीकाळी एसीशिवाय राहू न शकणारी, महागाड्या गाड्यांमधून प्रवास करणारी ही महिला काहीकाळ भर उन्हात छोले- कुलच्याची विक्री करत होती. उर्वशी यादव यांचा विवाह गुरुग्राममधील अमित यादव या श्रीमंत व्यक्तीशी झाला. अमित यादव एका बांधकाम कंपनीत नोकरी करत होते. चांगल्या नोकरीमुळं पैशाची कमतरता नव्हती. एकूणच यादव कुटुंब सुखवस्तू होतं. इंडिया टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.

    वाचा-सौंदर्याच्या मोहात भयंकर अवस्था! 4 वर्षे अंथरूणाला खिळलाय जिवंत तरुणीचा 'मृतदेह'

    मात्र 2016 मध्ये घडलेल्या एका घटनेनं उर्वशी आणि अमित यादव यांचं आयुष्य बदललं. 31 मे 2016 रोजी अमित यादव यांचा भीषण अपघात  झाला. या अपघातामुळं ते जायबंदी झाले. त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. परंतु, जखमा खोल असल्यानं त्याचा फारसा उपयोग झाला नाही. परिणामी त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यानंतर काही काळ बचतीच्या पैशावर कुटुंबाचा चरितार्थ सुरु राहिला. पण हे पैसेही संपत आले होते. कुटुंबाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागत होतं. औषध, मुलांची फी इतकचं काय तर महिन्याच्या रेशनसाठीही पैसे शिल्लक राहिले नव्हते. त्यामुळे उर्वशी यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. इंग्रजी भाषा येत असल्यानं उर्वशी यांनी नर्सरी स्कूलमध्ये शिक्षिका (Teacher) म्हणून नोकरी सुरू केली. परंतु, त्यातूनही तुटपुंजा पगार हातात पडत होता. पैशांची गरज भागात नसल्यानं अजून काही तरी काम केलं पाहिजे, असं उर्वशी यांना वाटू लागलं. परंतु, शिक्षण, नोकरी आणि मिळणारा पैसा यांचा कुठेच मेळ बसत नव्हता.

    बराच विचार केल्यानंतर उर्वशी यादव यांनी त्यांच्या पाक कौशल्याचा वापर करण्याचं ठरवलं. परंतु, हॉटेल किंवा रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी त्यांच्याकडं पुरेसं भांडवल नव्हतं. त्यामुळे त्यांनी छोट्याशा गाडीवर खाद्य पदार्थांची विक्री सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र कुटुंबियांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध केला. कुटुंबाची प्रतिष्ठा बघता असं करणं योग्य नाही, असं त्यांना सांगितलं गेलं. परंतु, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणाकरिता प्रतिष्ठेपेक्षा पैशांची गरज अधिक होती, हे जाणून त्यांनी छोले-कुलचे विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

    वाचा-Pegasus हेरगिरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

    मात्र ही व्यावसायिक वाटचाल त्यांच्यासाठी सोपी नव्हती. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र काही महिन्यांत त्यांच्या छोले-कुलच्याची चव खवय्यांच्या पसंतीस उतरली आणि त्यांची प्रसिध्दी वाढू लागली. लोकांना छोले-कुलच्याची चव आणि उर्वशी यांचा स्वभाव खूपच भावला. गुरुग्राम बाहेरील खवय्ये त्यांच्या छोले-कुलच्याची चव घेण्यासाठी येऊ लागले. सुरुवातीच्या काळात त्यांची दैनंदिन कमाई 3000 रुपयांपर्यंत पोहोचली. त्यानंतर त्यांची कहाणी सोशल मीडियात व्हायरल (Social Media Viral Story) झाली आणि प्रतिसाद आणखी वाढत गेला.

    आता या छोट्याशा गाडीचं रुपांतर एका रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) झालं आहे. या पैशांतून उर्वशी यांनी कुटुंबाची जबाबदारी उचलली. पती अमित यादव यांच्यावर उपचार केले. ते आजारपणातून बरे झाल्यावर आर्थिक स्थिती अधिक सुधारू लागली. आता या रेस्टॉरंटमध्ये अनेक पदार्थ मिळतात परंतु, छोले-कुलच्यालाच सर्वाधिक मागणी असते. स्वतःवर विश्वास असेल तर कितीही कठीण प्रसंग आलातरी तुम्ही परिश्रमाच्या जोरावर त्यातून सहज बाहेर पडू शकता, हेच उर्वशी यांच्या कर्तृत्वावरून दिसतं.

    First published:

    Tags: Inspiring story, Lifestyle