नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : पेगॅसीस (Pegasus) हेरगिरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकऱणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय (SC formed three member committee) घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती आर व्ही रविंद्र (R V Raveendran) यांच्या नेत्रृत्वाखाली तीन सदस्यीय समितीच स्थापना केली आहे.
The three-member committee will be headed by RV Raveendran, former Supreme Court Judge. Other members will be Alok Joshi and Sandeep Oberoi.
— ANI (@ANI) October 27, 2021
हेरगिरी प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणात एक्सपर्ट कमिटीची स्थापना करुन त्यामार्फत चौकशी व्हायला हवी. यासाठी सर्वोच्च न्यायालयानाने तीन सदस्यांची सतमिती स्थापन केली आहे.
या तिघांची समिती करणार चौकशी
न्यायालयाने या प्रकऱणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती तयार केली आहे. या समितीचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आरव्ही रवींद्रन करणार आहेत. तर समितीतील इतर सदस्यांमध्ये आलोक जोशी आणि संदीप ओबेरॉय यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन न्यायालयासमोर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 आठवड्यांनी होणार आहे.
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या खुलासानंतर उडाली होती खळबळ
काही महिन्यापूर्वी पेगासस हेरगिरी प्रकरणाचा मुद्दा समोर आला होता. आंतरराष्ट्रीय मीडिया एजन्सींनी दावा केला होता की भारत सरकारने इस्रायली स्पायवेअरच्या आधारे देशातील अनेक राजकारणी, पत्रकार आणि देशातील इतर सेलिब्रिटींची हेरगिरी केली होती. मात्र, केंद्र सरकारने हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं होतं.
प्रशांत किशोर हे 2014 साली भाजपचे लोकसभा निवडणुकीतील रणनितीकार होते. भाजपच्या घवघवीत यशानंतर त्यांनी इतर पक्षांसोबत काम करायला सुरुवात केली. त्यांनी काम केलेले बहुतांश पक्ष हे भाजपचे विरोधी पक्ष असल्यामुळे आपला फोन टॅप होत असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केल्याची बातमी समोर आली होती. प्रशांत किशोर यांचा फोन अद्यापही टॅप होत असल्याचं लक्षात आलं असून काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 14 जुलै या दिवशीदेखील त्यांचा फोन टॅप झाल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अनेक दिग्गजांची नावे
जगातील विविध देशांमधील 16 वृत्तसमूहांनी एकत्र येत केलेल्या या गौप्यस्फोटात भारतातील अनेक नेत्यांची, पत्रकारांची, वकिलांची, मंत्र्यांची आणि निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांचीदेखील नावंदेखील समोर आली आहेत. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही फोन टॅप झाल्याचं लक्षात आल्यानंतर काँग्रेस याप्रकरणी आक्रमक झाली आहे. तर सध्या माहिती तंत्रज्ञान खातं ज्यांच्याकडे आहे, त्या कॅबिनेट मंत्री अश्विनी वैष्णव यांचा फोनदेखील टॅप करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यांचा फोन टॅप झाला, त्यावेळी ते भाजपात नव्हते, अशीदेखील माहिती समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Supreme court