मराठी बातम्या /बातम्या /देश /देशभरात लष्कराच्या 9 हजार 500 एकर जमिनीवर अतिक्रमण! युपीमध्ये सर्वाधिक कब्जा तर..

देशभरात लष्कराच्या 9 हजार 500 एकर जमिनीवर अतिक्रमण! युपीमध्ये सर्वाधिक कब्जा तर..

देशभरात लष्कराच्या (Defence) 9 हजार 500 एकरांहून अधिक जमिनीवर अनाधिकृतपणे कब्जा करण्यात आला आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातील संरक्षण विभागाच्या अहवालात याबाबत खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये उत्तरप्रदेशात सर्वाधिक अतिक्रमण झाल्याची माहिती आहे.

देशभरात लष्कराच्या (Defence) 9 हजार 500 एकरांहून अधिक जमिनीवर अनाधिकृतपणे कब्जा करण्यात आला आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातील संरक्षण विभागाच्या अहवालात याबाबत खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये उत्तरप्रदेशात सर्वाधिक अतिक्रमण झाल्याची माहिती आहे.

देशभरात लष्कराच्या (Defence) 9 हजार 500 एकरांहून अधिक जमिनीवर अनाधिकृतपणे कब्जा करण्यात आला आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातील संरक्षण विभागाच्या अहवालात याबाबत खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये उत्तरप्रदेशात सर्वाधिक अतिक्रमण झाल्याची माहिती आहे.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 28 डिसेंबर : कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या जमिनीवर (Land) अतिक्रमण (Encroachment) झाल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो आणि पाहत असतो. सहसा अतिक्रमण करणाऱ्यांची नजर ही दुर्बल घटकांच्या जमिनींवर जास्त असते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की देशातील अतिक्रमण करणाऱ्यांची मजल आता इतकी वाढली आहे की त्यांनी लष्कराच्या (Army) जमिनींवरही अतिक्रमण केलं आहे. विशेष म्हणजे हे अतिक्रमण 100 किंवा 200 एकरांवर नाही तर देशभरात लष्कराच्या 9500 एकरांहून अधिक जमिनीवर अनाधिकृतपणे कब्जा करण्यात आला आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातील संरक्षण विभागाच्या अहवालात याबाबत खुलासा करण्यात आला आहे. संसदेत एका प्रश्नावरील उत्तर म्हणून हा खुलासा मांडण्यात आला आहे. या अहवालात देशभरातील विविध राज्यांमध्ये लष्कराच्या जमिनीवरील अतिक्रमणांचा तपशील देण्यात आला आहे.

    या तीन राज्यांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक अतिक्रमण

    संरक्षण मंत्रालयाच्या (Defence Ministry) अहवालात देशातील 30 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लष्कराच्या जमिनींवर झालेल्या अतिक्रमणाची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे लष्कराच्या अतिक्रमण झालेल्या सध्याच्या 9505 एकर जमिनींपैकी निम्म्याहून अधिक म्हणजेच 4572 एकर जमीन ही उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) आहे. उत्तर प्रदेशात लष्कराची 1927 एकर जमीन भू-माफियांच्या ताब्यात आहे. तर मध्य प्रदेशातील 1660 एकर आणि महाराष्ट्रातील 985 एकर जमीन अजूनही भू-माफियांच्या ताब्यात आहे. तसेच पश्चिम बंगालमधील लष्कराच्या 560 एकर जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्यात आला आहे.

    पाच वर्षांत केवळ एवढीच जमीन मिळाली लष्कराला परत

    लष्कराच्या जमिनींवर अतिक्रमण केल्यानंतर अतिक्रमणकारी सहजासहजी जमिनींवर ताबा सोडण्यास तयार होत नसल्याचं चित्र आहे. गेल्या पाच वर्षांत केवळ 1 हजार एकर जमीन अतिक्रमणकारकांच्या ताब्यातून सोडवण्यास यश मिळालं आहे, यावरून याचा अंदाज बांधता येऊ शकतो. विशेष म्हणजे, तीन राज्यांमध्ये लष्कराच्या जमिनींवर सर्वाधिक अतिक्रमण असून, गेल्या पाच वर्षात या राज्यांतील सर्वात कमी क्षेत्रावरील अतिक्रमण हटवण्यात यश आलं आहे. यात उत्तर प्रदेशातील 435 एकर जमिनीवरील अवैध अतिक्रमण हटवण्यात आलं. मध्य प्रदेशातील केवळ 43 एकर तर महाराष्ट्रातील 36 एकर जमीन अतिक्रमणमुक्त होऊ शकली.

    Malegaon Blast Case योगी आदित्यनाथांचं नाव घेण्यासाठी दबाव, खळबळजनक साक्ष

    लष्करी क्षेत्राबाहेरील जमिनी

    लष्कराच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याची बाब समोर आल्यानं, हा प्रकार कसा होऊ शकतो, असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. लष्कराचे जवान या भागात वास्तव्य करतात, सुरक्षेच्या दृष्टीनं तर तसे नाही ना? लष्कराची जमीन हीदेखील सामान्य क्षेत्रातील जमिनीप्रमाणे रिक्त राहते. ही जमीन सामान्यतः कॅपिंग ग्राउंड असते. ही जमीन लष्करी क्षेत्राच्या बाहेरील बाजूस असते. या जमिनीला कुंपण किंवा सीमा नसते. त्यामुळे अशा जमिनींवर अतिक्रमण करणं सोपं असतं.

    असा होतो कब्जा

    यापूर्वी लष्कराच्या जमिनींवर अतिक्रमण झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. या जमिनी बिल्डर (Builder) किंवा स्थानिक लोकांच्या (Local) ताब्यात गेल्याचंही स्पष्ट झालं आहे. अनेक प्रकरणांमध्ये लष्करी अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमतानं असे प्रकार झाल्याचं दिसून आलं आहे. काही प्रकरणांमध्ये लष्कराच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी या जमिनींच्या चोहोबाजूला असलेल्या जमिनी विकत घेतल्या जातात आणि नंतर हळूहळू लष्कराच्या जमिनींवर ताबा मिळवला जातो.

    काँग्रेस स्थापना दिन: सोनिया गांधी झेंडा फडकवताना घडलं असं की Video झाला व्हायरल

    राज्यनिहाय लष्कराच्या जमिनीवर झालेले अतिक्रमण असे.

    राज्य क्षेत्र (एकर मध्ये)

    1)उत्तर प्रदेश 1927.0671

    2) मध्य प्रदेश 1660.0222

    3) महाराष्ट्र 985.1292

    4) पश्चिम बंगाल 559.555

    5) हरियाणा 504.4691

    6) बिहार 477.0717

    7) राजस्थान 476.4523

    8) आसाम 460.5397

    9) नागालँड 357.53

    10) जम्मू आणि काश्मीर 339.7839

    11) झारखंड 304.912

    12) गुजरात 274.7971

    13) पंजाब 239.4823

    14) छत्तीसगड 165.768

    15) दिल्ली 147.451

    16) कर्नाटक 131.7923

    17) आंध्र प्रदेश 107.4125

    18) तामिळनाडू 92.8186

    19) अरुणाचल प्रदेश 87.8141

    20) तेलंगणा 60.4318

    21) उत्तराखंड 51.7232

    22) हिमाचल प्रदेश 42.7618

    23) अंदमान निकोबार 23.98

    24) मेघालय 11.0855

    25) मणिपूर 6.1308

    26) गोवा 5.1166

    27) केरळ 2.6739

    28) त्रिपुरा 1

    29) सिक्कीम 0.2903

    30) लक्षद्वीप 0.08

    First published:
    top videos

      Tags: Army, Indian army