मराठी बातम्या /बातम्या /देश /Malegaon Blast Case मध्ये ATS अधिकाऱ्यांनी योगी आदित्यनाथांचं नाव घेण्यासाठी टाकला होता दबाव, साक्षीदाराच्या विधानाने खळबळ

Malegaon Blast Case मध्ये ATS अधिकाऱ्यांनी योगी आदित्यनाथांचं नाव घेण्यासाठी टाकला होता दबाव, साक्षीदाराच्या विधानाने खळबळ

2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. योगी आदित्यनाथ आणि इतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित इतर चौघांची नावं घेण्यासाठी आपल्यावर एटीएसकडून दबाव टाकण्यात आल्याचं एका साक्षीदारानं कोर्टात सांगितलं आहे.

मुंबई, 28 डिसेंबर: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात (2008 Malegaon Blast Case) तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यांनी (ATS Officers) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS Leaders) नेत्यांची नावं घेण्यासाठी आपल्यावर दबाव (Pressure) टाकला होता, अशी साक्ष एका साक्षीदाराने (Witness) दिली आहे. विशेष NIA कोर्टासमोर साक्ष देताना त्याने हे खळबळजनक विधान केल्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत अनेक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या असून त्यातील बऱ्याच साक्षीदारांनी आपल्या साक्षी फिरवल्याचं चित्र गेल्या काही दिवसांत समोर येत आहे. 

काय म्हणाला साक्षीदार?

मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या स्फोट प्रकरणातील साक्षीदारांची तपासणी सध्या विशेष एनआयए कोर्टाकडून करण्यात येत आहे. हा स्फोट झाल्यानंतर त्याचा तपास करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी आपल्यावर दबाव टाकला होता. सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असणारे योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असणाऱ्या चौघांची नावं या प्रकऱणात घ्यावीत, यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला होता, असा दावा साक्षीदारानं या प्रकरणी आपली साक्ष फिरवताना केला आहे. योगींसह साक्षीदाराने घेतलेल्या नावांमध्ये इंद्रेश कुमार आणि असीमानंद यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

साक्षीदार फिरवतायत साक्षी

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत किमान 13 साक्षीदारांनी आपल्या मूळ साक्षीवरून घूमजाव केलं आहे. गेल्या आठवड्यातही एका साक्षीदारानं आपली साक्ष फिरवली होती. बॉम्बस्फोट झाल्याच्या घटनेनंतर सुरुवातीला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे देण्यात आला होता. त्यानंतर आतापर्यंत नोंदवलेल्या साक्षींची विशेष NIA कोर्टामार्फत तपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणात आता आणखी एका साक्षीदारानं आपली साक्ष फिरवल्याचं दिसून आलं आहे. 

First published:
top videos

    Tags: Bomb Blast, Malegaon, Mumbai ATS, Nia, Yogi Aadityanath