नवी दिल्ली, 28 डिसेंबर: देशातील सर्वात जुना पक्ष म्हणजेच काँग्रेस (Congress) आज 137 वा स्थापना दिवस साजरा (Congress 137th Foundation Day) करत आहे. त्यानिमित्त दिल्लीसह विविध राज्यांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजधानी दिल्लीत असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयातही हा कार्यक्रम झाला. मात्र येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडू शकला नाही आहे.
या कार्यक्रमावेळी सोनिया गांधींनी पक्षाचा झेंडा फडकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा झेंडा थेट खाली आला. ध्वज नीट बांधला गेला नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचं समजतंय. नंतर सोनिया गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
हेही वाचा- Corona चा नायनाट करणार भारत, मिळाली तिसरी Made In India लस
एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सोनिया गांधी ध्वज फडकवण्याचा प्रयत्न करत असताना दोरी ओढली असता तो उघडला गेला नाही आणि त्यानंतर एका सेवा दलाच्या कार्यकर्त्याने दोरी ओढली, ज्यामुळे ध्वज खाली पडला. पण सोनिया गांधींनी ते हातात धरले आहे. मात्र, काही वेळाने पुन्हा पक्षाचा झेंडा पूर्ण आदराने आणि विधीवत फडकवण्यात आला.
यानंतर कार्यक्रमास उपस्थित राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना ध्वजारोहण करण्यास सांगितलं. तेवढ्यात एक कार्यकर्ता आला आणि ध्वज घेऊन खूप उंच खांबावर चढला, पण तो काही उंचावरच जाऊ शकला. तेवढ्यात दुसरा कार्यकर्ता आला, त्याने झेंडा बांधण्याचा प्रयत्न केला. नंतर शिडीही मागवण्यात आली.
#WATCH | Congress flag falls off while being hoisted by party's interim president Sonia Gandhi on the party's 137th Foundation Day#Delhi pic.twitter.com/A03JkKS5aC
— ANI (@ANI) December 28, 2021
यावेळी 24, अकबर रोड येथील पक्ष मुख्यालयात पक्षाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपली गंगा-जमुनी संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सोनिया गांधी यांनी पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आपल्या भाषणात म्हटलं आहे.
सोनिया गांधी यांची केंद्र सरकारवर टीका
काँग्रेस स्थापना दिनानिमित्त सोनिया गांधी यांनीही देशाला आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यांनी केंद्र सरकारला घेरलं. सोनिया म्हणाल्या की, देशातील सर्वसामान्य नागरिक असुरक्षित आणि भयभीत होत असून लोकशाही आणि संविधानाला बगल देऊन हुकूमशाही चालवली जात आहे. अशा स्थितीत काँग्रेस गप्प बसू शकत नाही.
हमारी गंगा-जमुनी संस्कृति को मिटाने की कोशिश हो रही है। देश का आम नागरिक असुरक्षित महसूस कर रहा है। लोकतंत्र व संविधान को दरकिनार किया जा रहा है, ऐसे में कांग्रेस चुप नहीं रह सकती। कांग्रेस स्थापना दिवस पर कांग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी जी का संदेश। #CongressFoundationDay pic.twitter.com/Cy7LanjGet
— Congress (@INCIndia) December 28, 2021
काँग्रेसचा स्थापना दिवस
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ब्रिटिश राजवटीत 28 डिसेंबर 1885 रोजी झाली. त्याच्या संस्थापकांमध्ये ए.ओ. ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांचा समावेश आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे तो देशाचा प्रमुख राजकीय पक्ष बनला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sonia Gandhi (Author), काँग्रेस