लज्जास्पद! भररस्त्यात गळा चिरुन पत्नीची केली हत्या, जमाव VIDEO करीत विचारत होता हा प्रश्न

लज्जास्पद! भररस्त्यात गळा चिरुन पत्नीची केली हत्या, जमाव VIDEO करीत विचारत होता हा प्रश्न

एका छोट्याशा वादातून पतीला राग अनावर झाल्याने त्याने हे भयावह कृत्य केलं

  • Share this:

लखीमपूर, 24 जून : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) च्या लखीमपुर खेरी जिल्ह्यातील पलिया भागात बुधवारी पहाटे एका युवकाने आपल्या पत्नीवर गोळी घालून ठार केलं. इतक्यावर तो थांबला नाही तर त्याचा राग शांत न झाल्यास त्याने पत्नीच्या गळ्यावर सुऱ्याने वार केले.

यामध्ये सर्वात लाजीरवाणी गोष्ट अशी की तिथली गर्दी त्या महिलेला वाचवण्याऐवजी व्हिडीओ तयार करण्यात व्यस्त होती. इतकेच नाही तर व्हिडीओ बनवताना जमाव मारेकऱ्याला ती जिवंत आहे की तो मेली, असा प्रश्न विचारत आहे.  नंतर इतर काही लोकांनी पतीला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ न्यूज 18 वर उपलब्ध आहे, परंतु तो इतका भीषण आहे की तो दाखवला जाऊ शकत नाही.

हे वाचा-रुग्णवाहिकेने मागितले अवाच्या सव्वा पैसे; आईचा मृतदेह नेण्यासाठी आली ही वेळ

हे प्रकरण लखीमपूर खेरीच्या पलिया या भागातील मोहल्ला इंदिरा नगर कॉलनीतील आहे. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास जिल्हा शाहजहांपूर येथील रहिवासी असलेल्या रणजितचा पत्नी मंजू हिच्याबरोबर रस्त्याच्या कडेला काही वाद झाला, त्यामुळे संतप्त रणजितने मंजूला भररस्त्यात गोळी घालून ठार केले. तरीही त्याचा राग शांत झाला नाही. त्यानंतर त्याने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केले.

हे वाचा-दरमहा 595 रुपयांची गुंतवणूक करून व्हा लखपती, या सरकारी बँकेची फायदेशीर योजना

यावेळी या थरारक घटनेचा लोक व्हिडीओ बनवत होते. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी रणजितला पकडले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी रणजितला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले.

 

First published: June 24, 2020, 4:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading