जाहिरात
मराठी बातम्या / देश / UP Election Result 2022: अखिलेश यादव यांचं पहिलं ट्विट, आभार मानत म्हणाले...

UP Election Result 2022: अखिलेश यादव यांचं पहिलं ट्विट, आभार मानत म्हणाले...

UP Election Result 2022: अखिलेश यादव यांचं पहिलं ट्विट, आभार मानत म्हणाले...

UP Election Result 2022 : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्याला राजकीयदृष्ट्या एक वेगळंच महत्त्व आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागा आहे. या सर्व जागांचे निकाल आज स्पष्ट होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

उत्तर प्रदेश,10 मार्च: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्याला राजकीयदृष्ट्या एक वेगळंच महत्त्व आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागा आहे. या सर्व जागांचे निकाल आज स्पष्ट होणार आहे. सद्य कलानुसार भाजप आघाडीवर असला तरी समाजवादी पार्टीही (Samajwadi Party) 85 जागांनी पुढे आहे. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि अखिलेश यादव यांच्यात काटे की टक्करच आहे. अशातच पहिला कल समोर आल्यानंतर अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी एक ट्विट केलं आहे. अखिलेश यादव यांनी ट्विट केलं की, अजून चाचणी व्हायची बाकी आहे. आता वेळ आली आहे निर्णयाची. मतमोजणी केंद्रांवर रात्रंदिवस जागरुक आणि जाणीवपूर्वक कार्यरत राहिल्याबद्दल सपा-गठबंधनच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, समर्थकांचे, नेत्याचे, पदाधिकारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार! ‘लोकशाहीचे शिपाई’ विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच परतले!

जाहिरात

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा इतिहास थोडक्यात भाजपला गेल्या निवडणुकीत प्रथमच उत्तर प्रदेशात खणखणीत यश मिळालं. योगी आदित्यनाथ सरकार गेल्या वेळच्या 312 पैकी किती जागा टिकवणार याचे अंदाज वेगवेगळ्या एक्झिट पोल्सनी वर्तवले आहेत. बहुतेकांनी भाजपच्या पदरात बहुमत टाकलं आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या युपीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सपशेल फेल ठरताना दिसल्या. प्रत्यक्ष निकालात ते किती खरं ठरणार हे कळेल. मायावतींचा बहुजन समाज पक्ष कुठपर्यंत मजल मारेल हेही स्पष्ट होईल. 403 पैकी 325 जागा मिळवून भाजपने मित्र पत्राबरोबर गेल्या निवडणुकीत एक मजबूत सरकार दिलं होतं. एकट्या भाजपनेच 312 जागा खिशात घातल्या होत्या. त्या वेळी उत्तर प्रदेशात मोदींची लाट होती, असं म्हटलं जातं. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा भाजपने जाहीर केलेला नव्हता, तेव्हाचं हे घवघवीत यश आता पुन्हा मिळणार का हा प्रश्न आहे. योगी आदित्यनाथ सरकारला ते मागचं यश टिकवण्याचं मोठं आव्हान आहे. योगी आदित्यनाथ भाजपला किमान बहुमताचा आकडा गाठून देऊ शकतात का हेच पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे समजवादी पक्षाने गेल्या निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly election 2017) 47 जागा मिळवल्या होत्या. आता अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सायकल किती वेगाने आणि जोरात मुसंडी मारते हे पाहावे लागेल. खरी स्पर्धा ही भाजप आणि समाजवादी पक्षातच आहे. बाकी विरोधक तर भाजपपुढे सपशेल आपटले होते. यात सर्वाधिक हानी झाली होती काँग्रेसची. राहुल गांधी आणि सोनिया गांधी या दोघांचेही पारंपरिक लोकसभा मतदारसंघ आहेत. तसंच उत्तर प्रदेशचा भार प्रियांका गांधींवर सोपवण्यात आला होता. असं असूनही ऐतिहासिक दारुण पराभवाला काँग्रेसला सामोरं जावं लागतं होतं. काँग्रेसने गेल्या निवडणुकीत फक्त 7 जागा जिंकल्या होत्या. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने (BSP)जेमतेम 19 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे समजवादी पक्षाने गेल्या निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly election 2017) 47 जागा मिळवल्या होत्या. आता अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सायकल किती वेगाने आणि जोरात मुसंडी मारते हे पाहावे लागेल. खरी स्पर्धा ही भाजप आणि समाजवादी पक्षातच आहे. बाकी विरोधक तर भाजपपुढे सपशेल आपटले होते. यात सर्वाधिक हानी झाली होती काँग्रेसची. राहुल गांधी आणि सोनिया गांधी या दोघांचेही पारंपरिक लोकसभा मतदारसंघ आहेत. तसंच उत्तर प्रदेशचा भार प्रियांका गांधींवर सोपवण्यात आला होता. असं असूनही ऐतिहासिक दारुण पराभवाला काँग्रेसला सामोरं जावं लागतं होतं. काँग्रेसने गेल्या निवडणुकीत फक्त 7 जागा जिंकल्या होत्या. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने (BSP) जेमतेम 19 जागा जिंकल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात