Home /News /national /

EXCLUSIVE : हिंदूचं घर जळणार तेव्हा मुसलमानचं घर थोडी सुरक्षित राहणार : योगी आदित्यनाथ

EXCLUSIVE : हिंदूचं घर जळणार तेव्हा मुसलमानचं घर थोडी सुरक्षित राहणार : योगी आदित्यनाथ

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

"जर हिंदूचं घर जळणार तर मुसलमानचं घर थोडी सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित राहील तर मुसलमानही सुरक्षित राहील", असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

    लखनऊ, 9 जानेवारी : "दंगली होतात तेव्हा प्रत्येक धर्म आणि पंथाचे लोक प्रभावित होतात. जर हिंदूचं घर जळणार तर मुसलमानचं घर थोडी सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित राहील तर मुसलमानही सुरक्षित राहील. हिंदूचं घर सुरक्षित राहील तर मुसलमानचही घर सुरक्षित राहील. आम्ही गेल्या पाच वर्षात एकही दंगल होऊ दिली नाही", असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. एकूण सात टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर 'नेटवर्क 18' च्या 'अजेंडा UP' या आयोजित कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते. योगी आदित्यनाथ नेमकं काय म्हणाले? "दंगली होतात तेव्हा प्रत्येक धर्म आणि पंथाचे लोक प्रभावित होतात. जर हिंदूचं घर जळणार तर मुसलमानचं घर थोडी सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित राहील तर मुसलमानही सुरक्षित राहील. हिंदूचं घर सुरक्षित राहील तर मुसलमानचही घर सुरक्षित राहील. आम्ही गेल्या पाच वर्षात एकही दंगल होऊ दिली नाही", असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. 'सपा सरकारच्या काळात दंगलींच्या आगीत उत्तर प्रदेश जळत होता' "1990 मध्ये काँग्रेस विरोधातील विविध पक्षांची सत्ता आली. त्यावेळी रामभक्तांवर गोळ्या झाडण्याचं पाप समाजवादी पक्षाने केलं. फक्त 1990 सालीच नाही नंतर जेव्हा-जेव्हा समाजवादी पक्षाला संधी मिळाली तेव्हा कोणताही व्यक्ती स्वत:ला सुरक्षित समजत नव्हतं. सपा सरकारच्या काळात दंगलींच्या आगीमध्ये उत्तर प्रदेश जळत होता. आज आम्ही बोलू शकतो की, आम्ही उत्तर प्रदेशला दंगामुक्त केलं", असा दावा योगींनी केला. (देशात कोरोनाचा हाहा:कार, मोदींकडून तातडीची बैठक, लॉकडाऊनवर चर्चा?) 'ज्याच्यात दम आहे तोच मथुरा बनवणार' दरम्यान, योगी यांना यावेळी मथुराबाबत प्रश्न विचारण्यात आला. "आपल्या भूतकाळाच्या गौरवाच्या पुनर्सथापनेचं एक अभियान चालवलं जात आहे. आपण भारत आणि भारतीयताच्या गौरवाचा अनुभव घेण्यासाठी हे अभियान आहे. आम्ही मथुराही जाणार. ज्याच्यात दम आहे तोच मथुरा बनवणार. जे बोलत होते ते काहीच करु शकले नाहीत आणि आज अयोध्याला चकरा मारत आहेत", असा टोला योगींनी लगावला. 'अयोध्येचा निकाल येईल तेव्हा रक्ताच्या नद्या वाहतील, असं लोक म्हणायचे' "लोक म्हणायचे, जेव्हा अयोध्येचा निकाल येईल तेव्हा रक्ताच्या नद्या वाहतील. त्या लोकांनी बघितलं आता की, आम्ही कशाप्रकारे भव्य राम मंदिर बनविण्यासाठी पाऊल टाकलं आहे. राष्ट्रवाद हाच आमचा अजेंडा आहे. राममंदिर हे सांस्कृतिक राष्ट्रवादचा एक वाटा आहे. विश्वनाथचं धान आणि कुंभही त्याचाच वाटा आहे. पावन भूमीला दिव्य आणि भव्य बनविणं हे आमच्या राष्ट्रवादाचा एक भाग आहे", असं योगी आदित्यनाथ म्हणाले. (भाजपच्याच पाठिंब्यावर निवडून आलो, शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट) दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आपल्या स्वप्नात श्रीकृष्ण आल्याचा दावा केला होता. त्यावरदेखील योगींनी टीका केली. "त्यांच्या स्पप्नात कृष्ण आले असतील तर म्हणाले असतील, बेटा तू आता कामातून गेलास. तुमच्या नशिबी फक्त तीन जागा येणार. बाकीच्या 400 जागा भाजपला मिळणार. ज्यांचा श्रीराम आणि कृष्णांवर विश्वास नव्हता ते आज श्रीराम आणि कृष्णांचे नाव तोंडावर घेत आहेत. काँग्रेसने रामसेतूबद्दल जेव्हा राम मिथक असल्याचं म्हटलं होतं तेव्हा सपाने त्यांचं समर्थन केलं होतं. खरंतर त्यांच्याजवळ आता काहीच शिल्लक राहिलीले नाही. त्यामुळे ते राम आणि कृष्णाच्या शरण आले आहेत. पण खरा भक्त कोण ते देवही पाहतो. आम्हाला दायित्व मिळालं तेव्हा आम्ही रामभक्तांसाठी काम केलं. त्यांना जेव्हा संधी मिळालेली तेव्हा त्यांनी रामभक्तांवर गोळ्या झाडल्या. 400 जागा कुणाल्या द्यायच्या याचा विचार जनतेने केलेले आहे", असंदेखील योगी यावेळी म्हणाले.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या