नवी दिल्ली 27 ऑक्टोबर: केंद्र सरकारने Unlock 5.0ची मुदत 30 नोव्हेंपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे सध्या जी काही बंधने आहेत तीच पुढच्या महिनाभर कायम राहणार आहेत. कोरोनाची साथ (Coronavirus) अजुन संपलेली नाही त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात कडक लॉकडाऊन सुरूच असेल असही केंद्रीय गृहमंत्रालयाने (Ministry of Home Affairs (MHA) ) म्हटलं आहे. अनलॉकच्या प्रक्रियेनुसार जवळपास अनेक बंधन ही वगळण्यात आली असून काही बंधनेच कायम ठेवण्यात आली आहेत असंही केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.
नागरीकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं आवाहनही सरकारने केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका टळलेला नाही असंही सरकारने म्हटलं आहे.
अनलॉक करत असताना केंद्र सरकार मार्गदर्शक तत्व जाहीर करतं. त्यानुसार राज्य सरकार स्थानिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेत असतं. काही राज्यांमध्ये मंदिरं खुली करण्यात आली आहेत. त्याचबरोबर शाळा सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. मात्र महाराष्ट्रात सरकारने मंदिरं सुरू करण्याला अजुनही परवानगी दिलेली नाही.
प्रवास आणि इतर गोष्टींसाठी आता कुठलीही बंधन नाहीत. या अनलॉकच्या पुढच्या प्रक्रियेतही हे नियम असेल राहणार आहेत.
दरम्यान, भारत गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून कोरोनाशी निकराची झुंज देत आहे. 22 मार्चपासून पहिल्यांदाच देशाचा मृत्यूदर निच्चांकी पातळीवर आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. देशाचा सध्याचा मृत्यूदर हा 1.5 टक्के एवढा आहे.
Ministry of Home Affairs (MHA) issued an order today to extend the guidelines for Re-opening, issued on 30th September, to remain in force up to 30th November, 2020: Ministry of Home Affairs. #COVID19 pic.twitter.com/8jyhFhDrDz
— ANI (@ANI) October 27, 2020
महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग घसरणीला लागला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र हिवाळ्यात कदाचित संख्या पुन्हा वाढू शकते असा इशारा देण्यात आला आहे. युरोप आणि इतर काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे तिथे पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा लागला होता.
आता क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी भारत वापरू शकणार अमेरिकेचा डेटा, लष्कराला बळ
त्यामुळे नागरीकांनी बेफिकीर न राहता काळजी घ्यावी सर्व नियमांचं पाल करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. सरकारला पुन्हा लॉकडाऊन करण्याची इच्छा नाही आणि तशी वेळही येऊ नये असंही त्यांनी म्हटलं होतं.