आता क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी भारत वापरू शकणार अमेरिकेचा डेटा, चीन विरोधात ताकद वाढली

आता क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी भारत वापरू शकणार अमेरिकेचा डेटा, चीन विरोधात ताकद वाढली

BECA करारामुळे अमेरिका भारताला मदत करणार असून क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी भारताला अमेरिकेचा डेटा वापरता येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली27 ऑक्टोबर: भारत आणि अमेरिकेमध्ये मंगळवारी (27 ऑक्टोबर) ऐतिहासिक संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. Basic Exchange and Cooperation Agreement (BECA) भारतासाठी हा संरक्षण करार अतिशय महत्त्वाचा आहे. चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा करार लक्षवेधी ठरला असून त्यामुळे भारताची संरक्षण क्षमता वाढणार असून नवीन तंत्रज्ञानही भारताला मिळणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी त्यांनी थेट चर्चा केली.

या चर्चेनंतर सर्वांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली होती. BECA करारामुळे अमेरिका भारताला मदत करणार असून क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी भारताला अमेरिकेचा डेटा वापरता येणार आहे. आपलं टार्गेट निश्चित करण्यासाठी हा डेटा महत्त्वाचा ठरणार आहे.

अमेरिकेकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने कुठल्याही ठिकाणांचं अचुक लोकेशन ठरवता येणार आहे. त्यामुळे क्षेपणास्त्राला आपलं लक्ष्य गाठणं सोपं होणार आहे. आक्रमक चीला रोखण्यासाठी भारत आणि अमेरिकेने हा मोठा निर्णय घेतला आहे.

भारत आणि अमेरिका हे महान लोकशाही देश असून दोन्ही देशांनी एकत्र येत पुढे जण्याची ही सुवर्णसंधी आहे. जागतिक शांतता आणि सत्ता संतुलन योग्य राखण्यासाठी भारत आणि अमेरिका मोठी कामगिरी बजावू शकतात असं मत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी व्यक्त केलंय. चीनच्या विस्तारवादाला रोखण्याची आज गरज आहे असंही पॉम्पिओ म्हणाले.

दिल्लीतल्या हैदराबाद हाऊसमध्ये या बैठका पार पडल्या. त्या आधी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी दिल्लीतल्या युद्ध स्मारकावर जाऊन शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. या दोन्ही मंत्र्यांनी युद्ध स्मारकाला भेट देणं हे सांकेतिक अर्थाने अतिशय महत्त्वाचं मानलं जातं.

दोन्ही देशांच्या मैत्रिमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून आक्रमक चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज आहे. तर बदलत्या जागतिक परिस्थितीत भारतालाही अमेरिकेची गरज आहे. जेव्हा दोन्ही देशांच्या गरजा सारख्याच असतात तेव्हा मैत्री जास्त वेगाने पुढे जाते असं मत संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 27, 2020, 3:04 PM IST

ताज्या बातम्या