Unlock 3.0: 31 जुलैनंतर काय होणार? अनलॉक-3 मध्ये शाळा-मेट्रो राहणार बंदच पण...

Unlock 3.0: 31 जुलैनंतर काय होणार? अनलॉक-3 मध्ये शाळा-मेट्रो राहणार बंदच पण...

31 जुलै रोजी अनलॉक-2 (Unlock 2.0) संपणार आहे, त्यानंतर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 जुलै : देशात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र त्याचबरोबर अनलॉकची प्रक्रियाही सुरू झाली आहे. 31 जुलै रोजी अनलॉक-2 (Unlock 2.0) संपणार आहे, त्यानंतर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनलॉक-3 बाबत सरकार सध्या विचार करत आहे. याअंतर्गत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सिनेमागृह सुरू केली जाऊ शकतात. सूचना प्रसारण मंत्रालयाने याबाबत गृह मंत्रालयाला एक पत्र पाठवले आहे, यात सिनेमागृह खुली करण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे.

यापूर्वी माहिती प्रसारण मंत्रालय आणि सिनेमा हॉल मालकांमध्ये अनेक बैठका झाल्या. त्यानंतर सिनेमा हॉल मालकांनी 50 टक्के प्रेक्षकांसह थिएटर सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. सुरुवातीला 25 टक्के जागा आणि नियमांचे काटेकोर पालन करून सिनेमा हॉल सुरू करावे, अशी मंत्रालयाची इच्छा आहे. एवढेच नाही तर अनलॉक -3 मधील सिनेमा हॉलसोबत जिम देखील उघडण्यात येण्यावर चर्चा सुरू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा आणि मेट्रो उघडण्याच्या दृष्टीने विचार केला गेला नाही.

वाचा-मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी नवा प्रयोग, 9 गोष्टींद्वारे घातक व्हायरसला हरवणार

मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मार्चमध्ये देशभरात लॉकडाऊन लादण्यात आला. 30 जून रोजी अनलॉक-1 अंतर्गत लादलेला लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. त्यानंतर, अनलॉक -2 1 जुलैपासून सुरू झाला. 31 जुलै रोजी संपणार आहे. सध्या अनलॉक -3बाबत चर्चा सुरू आहेत. असा विश्वास होता की यावेळी शाळा आणि महाविद्यालये उघडण्याबाबत विचार केला जात आहे, परंतु गेल्या काही दिवसांत देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता सरकार याबाबत चिंतेत आहे.

वाचा-मुंबई लोकल कधी होणार सुरू? धारावी कोरोनामुक्त करणारे आयुक्त म्हणाले...

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच

देशात कोरोनानं थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 48 हजार 661 नवीन रुग्ण सापडले, तर 705 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 13 लाख 85 हजार 522 झाली आहे. यातील 4 लाख 67 हजार 882 रुग्ण सक्रीय आहेत. तर, 8 लाख 85 हजार 577 रुग्ण निरोगी झाले आहेत. 32 हजार 063 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारताचा रिकव्हरी रेट 63.9% झाला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: July 26, 2020, 2:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading