Home /News /national /

घरकामाला आली महिला आणि 20 जणांना झाला कोरोना, 750 क्वारंटाइन

घरकामाला आली महिला आणि 20 जणांना झाला कोरोना, 750 क्वारंटाइन

इमारतीमधील 750 जणांना आता क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

    नवी दिल्ली, 05 जून : देशभरात कोरोनाचं संक्रमण पसरतच आहे. कितीही काळजी घेतली तरी एका छोट्या चुकीमुळे कोरोनाचं संसर्ग वाढायला सुरुवात होते. राजधानी दिल्लीत पिझ्झा डिलिव्हरी बॉय कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आता एका रहिवासी इमारतीत घरकाम करणाऱ्या महिलेला कोरोना झाल्यानं खळबळ उडाली आहे. दिल्लीमध्ये घरकाम करण्यासाठी एका रहिवासी इमारतीत महिला येत होती. त्यानंतर 20 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या इमारतीमधील 750 जणांना आता क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दिल्लीतील पीतपुरा परिसरात हा खळबळजनक प्रकार घडला आहे. घरकाम करणाऱ्या महिलेमुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढल्याचं सांगितलं जात आहे. एका घरातील कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे 20 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हे वाचा-कामागारांचे पगार न देणाऱ्या कंपन्यांवर 12 जूनपर्यंत कारवाई करू नका- SC डीएम यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची पहिली केस 24 मे रोजी समोर आली होती. त्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. या भागातील एका घरात काम करणार्‍या महिलेमुळे हे संक्रमण पसरल्याचे सांगण्यात आले. त्या महिलेद्वारे प्रथम एका मुलाला आणि नंतर घरातील इतर सदस्यांद्वारे संसर्ग झाला. भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात सुमारे दहा हजार नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. याशिवाय एकाच वेळी 273 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना रूग्णांची संख्या 2,26,770 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 6348. लोक मरण पावले आहेत. गेल्या एका दिवसात 9851 प्रकरणं समोर आली आहेत. हे वाचा-धक्कादायक! केरळमध्ये याआधी झाला आहे हत्तीणीचा फटाक्यांमुळे क्रूर मृत्यू संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या