कामागारांचे पगार न देणाऱ्या कंपन्यांवर 12 जूनपर्यंत कारवाई करू नका- सुप्रीम कोर्ट

कामागारांचे पगार न देणाऱ्या कंपन्यांवर 12 जूनपर्यंत कारवाई करू नका- सुप्रीम कोर्ट

लॉकडाऊ दरम्यान कामावरून कामगारांचे पगार कमी करू नयेत अशा सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या होत्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 जून : देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं 70 दिवस लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यादरम्यान अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद झाले. अनेक कंपन्यांची काम रडखली. काही कंपन्यांनी पगारात कपात केली तर काही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे पगारही देण्यात आले नाही. अशा कंपन्यांविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणालाही कामावरून काढू नये आणि पगारात कपात करू नये असं आवाहन केलं असतानाही अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं किंवा पगार दिले नाहीत. अशा कंपन्यांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. लॉकडाऊन दरम्यान कामगारांचे पगार ज्या कंपन्यांनी दिले नसतील त्यांच्याविरुद्ध येत्या 12 जूनपर्यंत कारवाई करू नये असे निर्देश सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला दिले आहेत.

लॉकडाऊ दरम्यान कामावरून कामगारांचे पगार कमी करू नयेत अशा सूचना केंद्र सरकारकडून देण्यात त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आले असतानाच सुप्रीम कोर्टानं 12 जूनपर्यंत कारवाई करू नयेत असे निर्देश दिले आहेत. या संदर्भातील पुढील सुनावणी 12 जूनला होणार आहे.

हे वाचा-भयंकर! खचाखच भरली मुंबईतील सर्व रुग्णालयं, नवीन रुग्णांसाठी जागाच नाही

हे वाचा-मुंबईत धक्कादायक प्रकार, पैशांसाठी स्वॅब टेस्ट करून दिले बनावट कोरोना रिपोर्ट

हे वाचा-लोकप्रिक मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

First published: June 5, 2020, 11:21 AM IST

ताज्या बातम्या