मराठी बातम्या /बातम्या /nagpur /वंशाचा दिवा नाही तर हवी होती मुलगी, रागाच्या भरात चिमुकल्याची दगडावर आपटून हत्या

वंशाचा दिवा नाही तर हवी होती मुलगी, रागाच्या भरात चिमुकल्याची दगडावर आपटून हत्या

मुलाच्या जन्मासाठी आजही आपल्या देशात अट्टहास केला जातो. पण नागपुरातून (Nagpur Crime) या उलट घटना समोर आली आहे. यामध्ये एका पित्याला मुलगा नव्हे तर मुलगी (Man Wanted a Girl Child) हवी होती. पण या इच्छेतून त्याने टोकाचं पाऊल उचललं आहे

पुढे वाचा ...

नागपूर, 27 मे: अनेकदा अशा घटना समोर येतात की वंशाचा दिवा जन्माला यावा म्हणून लोकं उपासतापास, होमहवन करतात. इतकंच काय अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन नरबळी देखील देतात. आपल्या पत्नीला किंवा सुनेला मुलगा झाला नाही फक्त मुलीच झाल्या म्हणून तिचा छळ करणारे देखील कमी नाहीत. एकूणच काय मुलासाठी वाट्टेल तो अट्टहास केला जातो. पण नागपुरातून (Nagpur Crime) या उलट घटना समोर आली आहे. यामध्ये एका पित्याला मुलगा नव्हे तर मुलगी (Man Wanted a Girl Child) हवी होती. एकीकडे मुलगी हवीचा अट्टहास धरणाऱ्या पित्याने मुलाच्या बाबतीत अत्यंत टोकाचं पाऊल उचललं आहे. या वडिलांनी मुलाला मारुन (Man Killed his Son) टाकताना मागेपुढे पाहिलं नाही. संबंधित घटना नागपूर जिल्ह्यातील (Nagpur News) खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या वाकोडी परिसरात घडली आहे.

नागपूरच्या वाकोडी परिसरात घडलेल्या या घटनेमुळं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मुलगा नाही तर मुलगी व्हावी असं या पित्याला वाटत होतं. "मला मुलगी हवी होती पण मुलगा झाला" या विषयावरून संबंधित आरोपीचा त्याचा पत्नीबरोबर वाद झाला. झालेल्या वादातून रागाच्या भरात त्याने टोकाचं पाऊल उचललं. जन्मदात्या पित्याने एक वर्षाच्या चिमुकल्याची दगडावर आपटून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस स्टेशन अंतर्गत वाकोडी याठिकाणच्या या घटनेमुळे त्या माऊलीने पोटचं पोर तर गमावलच पण आता पतीला देखील तुरुंगात पाहावं लागणार आहे.

हे वाचा-VIDEO: विरारमध्ये एका इसमाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न, घटना CCTVत कैद

सत्यम कौरती असं त्या चिमुकल्याचे नाव आहे. तर आरोपी वडिलांचं नाव भजन कौरती असून नागपूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी नागपूर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news, Nagpur