नवी दिल्ली, 05 जुलै : अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत असताना सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं ते काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार याकडे. दरम्यान, Petrol, Diesel आणि सोनं महाग झालं आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून Petrol आणि डिझेलचे नवे दर लागू होणार आहेत.Petrol आणि Dieselवर 1 रूपया सेस वाढवल्यानं Petrol, Dieselच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. 1 रूपयांनी सेस वाढवल्यानं आता पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत 2 रूपयानं वाढ होणार आहे.
सोन्याचे दर वाढले
दरम्यान, सोन्याच्या दरात देखील वाढ होणार आहे. सोन्यासह इतर मौल्यवान रत्नांवरची कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. सोन्यावर सरकारनं 12 टक्के कस्टम ड्युटी केली आहे. त्यामुळे सोन्याचा किंमतीमध्ये देखील वाढ झाली आहे.
Union Budget 2019 : भाड्यानं घर घेऊन राहणाऱ्यांसाठी खुशखबर
Income Tax भरण्यासाठी आता PAN Cardची गरज नाही
Income Tax भरण्यासाठी PAN Card हवंच असा सरकारचा आजपर्यंतचा नियम होता. PAN Card नसल्यास आयकर भरणं शक्य होत नव्हतं. पण, आता काळजी करण्याची कारण नाही, तुम्ही PAN Card शिवाय देखील Income Tax भरू शकता. होय, आता PAN Card नसल्यास Income Tax भरणं शक्य होणार आहे. Income Tax भरण्यासाठी आता PAN Card ऐवजी आधार कार्ड चालणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सरकारचं हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे कोणत्या घोषणा होणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्याचे देखील आभार मानले.
भाजपसह काँग्रेसलाही धक्का; शेट्टी, राज आणि राष्ट्रवादीचं नवं गणित