मराठी बातम्या /बातम्या /देश /

देशात बेरोजगारीचं संकट; पदवीधरांची नोकरीसाठी वणवण, डिप्लोमावाल्यांचेही वाईट हाल

देशात बेरोजगारीचं संकट; पदवीधरांची नोकरीसाठी वणवण, डिप्लोमावाल्यांचेही वाईट हाल

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे देशात असंख्य नागरिक बेरोजगार (Unemployment) झाले आहेत. यामध्ये उच्च शिक्षित किंवा पदवीधर नागरिकांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून (PLFS) समोर आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 01 ऑगस्ट: मागील जवळपास दीड वर्षांपासून देशात कोरोना विषाणूनं थैमान (Corona pandemic) घातलं आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे देशात असंख्य नागरिक बेरोजगार (unemployment) झाले आहेत. सेवा क्षेत्रात काम करण्याऱ्या लोकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातील एकूण बेरोजगार लोकांमध्ये शिकलेले किंवा पदवीधर (Graduates and post graduates) लोकांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून (PLFS Survey) समोर आली आहे. तर डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स करण्याऱ्या विद्यार्थ्यांचे तर याहूनही वाईट अवस्था आहे.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या, पेरिओडिक लेबर फोर्स सर्वे (PLFS) च्या अहवालानुसार, देशातील सर्व राज्यांमध्ये एकूण बेरोजगारीचा दर (Unemployment rate in india)सरासरी 4.8% इतका आहे. हे सर्वेक्षण जुलै 2019 ते जून 2020 दरम्यान करण्यात आलं आहे. यातील आकडेवारीनुसार, देशात बेरोजगारांमध्ये सर्वाधिक मोठा वाटा 17.2 टक्के पदवीधरांचा आहे. त्या पाठोपाठ 14.2% डिप्लोमा किंवा सर्टिफिकट कोर्स करणाऱ्यांचा आहे.  त्याचबरोबर, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेते तब्बल 12.9% तरुण बेरोजगार असल्याची धक्कादायक माहिती संबंधित सर्वेक्षणातून समोर आली आहे.

हेही वाचा-लैंगिक हिंसाचाराच्या रिपोर्टिंगबाबत भारतीय माध्यमांवर UNESCO ची टीका

सर्व राज्यांच्या एकूण आकडेवारीच्या तुलनेत माध्यमिक किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेले 10.1 टक्के तरुण बेरोजगार आहेत. तर  उच्च माध्यमिक किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेल्या सुशिक्षित बेरोजगारांची संख्या 7.9 टक्के इतकी आहेत. दिल्लीत हा आकडा 13.5 टक्के, बिहारमध्ये 19.9 टक्के, हरियाणा 13.4 टक्के, झारखंड 14 टक्के, उत्तर प्रदेश 15.6 आणि उत्तराखंड सर्वाधिक 21.9 टक्के बेरोजगार आहेत. तर बिहारमध्ये सरासरी सुशिक्षित बेरोजगारीचा दर 5.1 टक्के, दिल्लीमध्ये 8.6 टक्के, हरियाणामध्ये 6.4 टक्के, झारखंडमध्ये 4.2 टक्के, उत्तर प्रदेशात 4.4 टक्के आणि उत्तराखंडमध्ये 7.1 टक्के इतकी आहे. एकट्या बिहारमध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेले तब्बल 85 तरुण बेरोजगार आहेत.

हेही वाचा-मोदी सरकारने जाहीर केली Corona Hotspot ठरणारी 10 राज्य! महाराष्ट्राचाही समावेश

एकीकडे भारत हा तरुणांचा देश मानला जातो. दुसरीकडे त्याच तरुणाच्या हातात रोजगार नसल्यानं देशाच्या विकासात अनेक अडचणी निर्माण होतं आहे. वाढत्या लोकसंख्यमुळे देशात आधीच बेरोजगारी दर जास्त होता. कोरोना प्रादुर्भावामुळे ही परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. देशातील लाखो विद्यार्थी आजही रोजगाराच्या शोधात आहेत. मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा फटका त्यांना बसत आहे. यामध्ये अशिक्षित तरुणांपेक्षा शिक्षित तरुणांचे सर्वाधिक हाल होत आहेत. पदवीधर तरुणांना नोकरीसाठी वणवण करावी लागत आहे.

First published:

Tags: Corona virus in india, India, Unemployment