अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोना, कराचीतल्या लष्करी हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोना, कराचीतल्या लष्करी हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

दाऊद आणि त्याच्या बायकोला कोरोना असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या गार्ड्स आणि इतर स्टाफला क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 5 जून: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याची बायको महजबीन (Mahzabeen) या दोघांच्याही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यानंतर त्या दोघांनाही कराचीतल्या लष्करी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे. दाऊद आणि त्याच्या बायकोला प्राथमिक लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली आणि नंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दाऊद आणि त्याच्या बायकोला कोरोना असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या गार्ड्स आणि इतर स्टाफला क्वारंटाइन करण्यात आलं आहे. पाकिस्तान सरकार यावर काहीही बोलण्यास तयार नाही. मात्र दाऊद आणि त्याची बायको ही पॉझिटिव्ह असल्याची माहिती या सूत्रांनी दिलीय.

दाऊद आणि त्याचं कुटुंबीय कराचीमधल्या अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या भागात राहतात. या भागात लष्करी अधिकाऱ्यांची वसाहत आहे. दाऊदला पाकिस्तानच्या लष्कराचं पूर्ण संरक्षण आहे.

दाऊदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत करण्यात आलं आहे. यानंतरही पाकिस्तान त्याला पूर्ण संरक्षण देत आहे. दाऊद पाकिस्तानात असल्याचे पुरावे भारताने पाकिस्तानला वारंवार दिले होते. मात्र पाकिस्तानने ते कधीच मान्य केलेलं नाही.

हे वाचा -  'आगीशी खेळतोय भारत, सगळं काही जळून जाईल', चीनने पुन्हा एकदा दिला इशारा

1993च्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद पाकिस्तानात पळून गेला होता. तेव्हापासून भारतीय सुरक्षा यंत्रणा त्याच्या मागावर असून तो सगळ्यांनाच गुंगारा देण्यात यशस्वी ठरला आहे.

पाकिस्तानमधल्या कराचीमध्ये कोरोनाचा हॉटस्पॉट तयार झाला असून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

पाकिस्तानमधील काही भागांमध्ये हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी भीषण स्थिती असल्याचं समोर आलं आहे. अपुरा वैद्यकीय सुविधा, अन्नाची कमतरता यामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत.

हे वाचा - 'या' ब्लड ग्रुपला कोरोनाचा सर्वात जास्त धोका, डॉक्टरांचा नवा रिसर्च आला समोर

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये 800 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तिथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वैद्यकीय सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण असूनही तिथे केवळ दोनच व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. त्यात पाकिस्तान सरकारकडून अद्याप मदत मिळाली.

First published: June 5, 2020, 3:40 PM IST

ताज्या बातम्या