Home /News /national /

'आगीशी खेळतोय भारत, सगळं काही जळून जाईल', चीनने पुन्हा एकदा दिला इशारा

'आगीशी खेळतोय भारत, सगळं काही जळून जाईल', चीनने पुन्हा एकदा दिला इशारा

अमेरिकेच्या समर्थनार्थ जी-7 मध्ये सामील होऊन भारत आगीशी खेळत आहे, त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं, असा इशारा चीननं भारताला दिला आहे.

    बीजिंग, 05 जून : गेल्या काही दिवसांपासून LAC लडाखच्या सीमेवर भारत आणि चीन सैनिकांमध्ये तणावाचं वातावरण आहे. अशात चीनने पुन्हा एकदा भारताला इशारा दिला आहे. रशिया आणि भारत (India) हे दोन देश G-7 देशांमध्ये समाविष्ट करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण यासाठी रशिया तयार असल्याचं दिसत नाही. पण ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यामुळे भारत याबाबत सकारात्मक असू शकतो. अशात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत मोठा होत असताना ही बाब चीनला (China)खूपत आहे. यावरून चीनने भारताला इशारा दिला आहे. अमेरिकेला समर्थन देऊन भारत आगीशी खेळत असल्याचं चीनने म्हटलं आहे. यामुळे भारताचं मोठं नुकसान होईल, असा इशारा चीननं भारताला दिला आहे. चीनचे अधिकृत माध्यम ग्लोबल टाईम्समध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या प्रस्तावाचा विकसित देशांना जरी फायदा झाला, तरी भारताला यातून तोटा होणार हे स्पष्ट असल्याचं म्हटलं आहे. अमेरिका-चीनच्या तणावाचा फायदा घेत ट्रम्प हे चीनला दडपण्याच्या प्रयत्न करत आहेत. चीनच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक धोरणामध्ये भारताची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कारण ती जगातील 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्थाच नाही तर तिचे एक मोठं सैन्यही आहे, असंही चीननं म्हटलं आहे. ग्लोबल टाईम्समध्ये दिलेल्या वृत्तानुसार, भारतात आताचं सरकार सत्तेचं भुकेलं आहे त्यामुळे त्यांना ट्रम्प यांचे डाव दिसत नाही. यामध्ये भारतात अशा काही संस्था आहेत ज्या चीनबद्दल अफवा पसरवत आहेत आणि भारत सरकारही अशा संघटनांवर कारवाई करत नाही असा आरोपही चीनकडून करण्यात आला आहे. या अहवालात असं म्हटलं आहे की, चीनची मैत्रीपूर्ण वागणूक असूनही भारत आम्हाला शत्रू मानतो, ज्यामुळे दोन्ही देशांमधील वारंवार तणाव निर्माण होतो. यापूर्वी रविवारी चीनने भारत-अमेरिका-चीन वादापासून दूर रहावं अशी धमकी दिली होती.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या