नवी दिल्ली, 30 मे : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचाव करण्याचा एक मार्ग म्हणजे सोशल डिस्टन्सिंग (social distancing) आणि आता हेच सोशल डिस्टन्सिंग राखण्यात तुम्हाला तुमच्या मोबाइलची मदत होणार आहे. सोशल डिस्टन्सिंगसाठी गुगलनं (google) एक नवं अॅप (app) लाँच केलं आहे.या अॅपचं नाव आहे Sodar. दोन व्यक्तींमध्ये किमान 2 मीटर अंतर असावं, असा सल्ला दिला जातो आहे. याआधी अनेकांना हे अंतर राखण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्याचं आपण सोशल मीडियावर पाहिलंच आहे. मात्र आता गुगलने तुमच्यासाठी असं अॅप आणलं आहे, जे तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी मदत करेल.
Sodar - use WebXR to help visualise social distancing guidelines in your environment. Using Sodar on supported mobile devices, create an augmented reality two meter radius ring around you. #hacktohelp https://t.co/Bu78QrEN9f pic.twitter.com/kufatNFDQk
— labs.google (@labsdotgoogle) May 28, 2020
कंपनीने सांगितल्यानुसार हे अॅप युजर ज्या ठिकाणी आहे, तिथं सोशल डिस्टन्सिंगला व्हिज्युअलाइझ करण्यासाठी WebXR मदत घेतं. त्यानंतर ऑग्मेंटेड रिअॅल्टीच्या मदतीने दोन मीटर रेडअसची एक व्हिज्युअल रिंगही तयार करतं. स्मार्टफोन वापरणारी व्यक्ती जसजशी सरकेल तशी ही रिंगही सरकेल. सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन झालं तर स्मार्टफोन युजर्सला अलर्ट करेल. हे वाचा - हातांमार्फत कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका; मग आता पायांनीच लिफ्ट चालणार हे अॅप गुगल स्टोरवर उपलब्ध नाही. तर क्रोम ब्राऊजरमार्फत तुम्हाला वापरता येणार आहे. कसं वापराल हा अॅप? तुम्हाला सर्वात आधी क्रोमवर Sodar या वेबसाइटवर जावं लागेल. जर तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर ही वेबसाइट उघडली असेल तर त्यावरील क्युआर कोड मोबाइलवर स्कॅन करा. जेव्हा स्क्रिनवर प्रॉम्प्ट मेसेज येईल तेव्हा Enter AR वर क्लिक करा. त्यानंतर कॅमेरा सुरू होईल आणि तुम्हाला 2 मीटरचं रेडिअस दिसू लागेल. हे वाचा - पान-तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांना दणका, सरकार करणार ही कडक शिक्षा!