Home /News /national /

Explainer: भारत ब्रिटनच्या Corona Red List मध्ये; भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर अन्य देशांतही आहेत हे निर्बंध

Explainer: भारत ब्रिटनच्या Corona Red List मध्ये; भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर अन्य देशांतही आहेत हे निर्बंध

India Travel Adversary: कोरोना संसर्गातल्या या वाढीमुळे वेगवेगळ्या देशांनी भारतातून त्या देशात जाणाऱ्या प्रवाशांवर (Travel ban India) वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध घातले आहेत.

नवी दिल्ली, 22 एप्रिल: भारतात कोरोना रुग्णांच्या (Covid Patients India data) संख्येत वेगाने वाढ होत आहे. काल दैनंदिन रुग्णसंख्येने तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना संसर्गातल्या या वाढीमुळे वेगवेगळ्या देशांनी भारतातून त्या देशात जाणाऱ्या प्रवाशांवर (Travel ban India) वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध घातले आहेत. 'इंडियन एक्स्प्रेस'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. कुठल्या देशांत भारतीयांना प्रवेश निर्बंध? शुक्रवारपासून युनायटेड किंग्डम (UK) अर्थात ब्रिटनने भारताला प्रवासाच्या बाबतीत 'रेड लिस्ट'मध्ये (Red List) टाकलं आहे. त्यानंतर लगेचच अमेरिकेच्या (US) 'सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन'ने (CDC) अमेरिकेतल्या नागरिकांना भारतप्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. रविवारपासून हाँगकाँगने (Hong kong)इमर्जन्सी सर्किट ब्रेकर (Emergency Circuit Breaker) कार्यान्वित केला आहे. त्यानुसार, 20 एप्रिलपासून 14 दिवसांसाठी भारतातून हाँगकाँगमध्ये प्रवासी विमानं (Passenger Flights) येण्यास बंदी घालण्यात आली आहे. Explainer : देशात कोरोना वेगानं का पसरतोय; डबल म्युटंट व्हेरियंट ठरतोय कारणीभूत? न्यूझीलंडनेही (New Zealand) भारतातून आलेल्या प्रवाशांना देशात प्रवेश मिळणार नसल्याचं या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केलं होतं. भारतातून प्रवासावर अन्य देश निर्बंध का घालत आहेत? कोरोना विषाणूच्या भारतात पहिल्यांदा आढळलेल्या व्हॅरिएंटची लागण झालेले 103 रुग्ण ब्रिटनमध्ये आढळले. त्यामुळे भारताला प्रवासासाठीच्या रेड-लिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला. हेच कारण देऊन हाँगकाँगने भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांना दोन आठवडे तिथे प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय, भारतात दिवसेंदिवस वेगाने वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येबद्दलही त्या देशांकडून काळजी व्यक्त करण्यात येत आहे. कोविड-19च्या संसर्गाच्या परिस्थितीनुसार काही पातळ्या अमेरिकेच्या CDC ने ठरवल्या आहेत. त्यातली चौथ्या क्रमांकाची पातळी सर्वोच्च असून, आताच्या परिस्थितीमुळे भारताचा समावेश तिसऱ्या पातळीवरून चौथ्या पातळीत करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला. त्यामुळे भारतात न जाण्याचा सल्ला CDC ने दिला आहे. 20 एप्रिलच्या सकाळी आठ वाजताच्या स्थितीनुसार, भारतात कोरोनाचे 20 लाख 31 हजार 977 अॅक्टिव्ह रुग्ण होते. त्याच्या आदल्या दिवशी एक लाख दोन हजार 648 नवे रुग्ण आढळले होते. - ब्रिटनच्या रेड लिस्टमध्ये भारताचा समावेश झाला आहे? त्याचा अर्थ काय? - ब्रिटनच्या सरकारने याबद्दल काही नियम जाहीर केले आहेत. तिथल्या स्थानिक वेळेनुसार 23 एप्रिल रोजी पहाटे चार वाजण्यापूर्वी भारतातून ब्रिटनमध्ये गेलेल्या व्यक्तींनी स्वतःच्या वास्तव्याच्या ठिकाणी स्वतःला 10 दिवस सेल्फ-आयसोलेट करणं गरजेचं आहे. तसंच, भारतातून आल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि आठव्या दिवशी कोविड-19ची चाचणी करणंही बंधनकारक आहे. पुण्यातील 'हे' रुग्णालय कोरोनाग्रस्तांसाठी ठरतंय वरदान; मृत्यूदर अवघा 0.1 टक्के भारतात 10 दिवस राहिलेल्या व्यक्तींना ब्रिटनमध्ये 23 एप्रिल रोजी पहाटे चार वाजल्यानंतर प्रवेश करायचा असेल, तर सरसकट सर्वांना प्रवेशाची परवानगी दिली जाणार नाही. ते केवळ ब्रिटिश किंवा आयरिश नागरिक असतील किंवा ब्रिटनमध्ये वास्तव्य करण्याचा अधिकार असलेले अन्य देशांचे नागरिक असतील, तरच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तसंच, त्यांना क्वारंटाइन हॉटेलमध्ये क्वारंटाइन कालावधी पूर्ण करणं बंधनकारक असेल. अमेरिकेच्या CDCच्या निर्णयाचा अर्थ काय? - अमेरिकेच्या CDCने त्यांच्या ट्रॅव्हल नोटिस पेजवर काही सूचना लिहिल्या आहेत. 'भारतातल्या सध्याच्या परिस्थितीमुळे अगदी लसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांनाही कोरोना व्हॅरिएंटची लागण होण्याचा किंवा त्यांच्या माध्यमातून तो पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे भारतात प्रवास टाळला पाहिजे. तरीही भारतात जाणं अत्यावश्यकच असेल, तर तिथे जाण्यापूर्वी लसीकरण पूर्ण करून जावं. तसंच सर्वांनी मास्क घालावा, दुसऱ्या व्यक्तींपासून सहा फूट अंतर राखावं, गर्दी करणं टाळावं आणि हात वारंवार धुवावेत,' अशा सूचना त्या पेजवर देण्यात आल्या आहेत. - अमेरिका आणि ब्रिटनमधून भारतात येण्यासाठी सध्या प्रवासाचे काही पर्याय आहेत का? - सध्या तरी एअर इंडिया, विस्तारा, युनायटेड, ब्रिटिश एअरवेज या विमान कंपन्या भारत, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सेवा देत आहेत. भारतातल्या दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आदी विमानतळांवर लंडन, न्यूयॉर्क - जॉन एफ. केनेडी आणि नेवार्क आदी विमानतळांवरून सेवा सुरू आहे.
First published:

Tags: Coronavirus, Travel by flight, United kingdom

पुढील बातम्या