जाहिरात
मराठी बातम्या / देश / उद्धव ठाकरेंना सोडायची नाही काँग्रेस, NCP ची साथ; 'या' निर्णयामुळे एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम?

उद्धव ठाकरेंना सोडायची नाही काँग्रेस, NCP ची साथ; 'या' निर्णयामुळे एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम?

उद्धव ठाकरेंना सोडायची नाही काँग्रेस, NCP ची साथ; 'या' निर्णयामुळे एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम?

दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे पुन्हा एकत्र येणार या चर्चेला पूर्णविराम मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • -MIN READ Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 जुलै : राष्ट्रपतीपदाची निवडणुकीत (Presidential election) उद्धव ठाकरेंच्या गटाने दौपद्री मुर्मू यांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला असला तरी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Election of Vice President) ते विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचं समर्थक करणार असल्याचं सांगितलं जात आहे. एनसीपी सुप्रीमो शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, ते अल्वा यांचं समर्थन करतील. भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदेंनी राज्यसरकारमध्ये सत्ता स्थापन केली आहे आणि उद्धव ठाकरेंना बाहेर केलं आहे. मात्र यानंतरही एनडीएच्या उमेदवाराला समर्थन दिल्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेस आणि एनसीपी उद्धव ठाकरेंच्या गटासह आनंदात असल्याचं दिसत आहे. संजय राऊत म्हणाले की, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकता कायम आहे. ते म्हणाले की, ‘द्रौपदी मुर्मू एक आदिवासी महिला आहेत आणि देशात आदिवासींसाठी लोकांच्या मनात संवेदनशीलता आहे. आमचे अनेक आमदार आणि खासदारदेखील आदिवासी समाजातील आहेत. यासाठी आम्ही त्याचं समर्थन करण्याची घोषणा केली. मात्र येथे ते मार्गारेट अल्वा यांचं समर्थन करतील. राज्यसभेत शिवसेनेचे खासदार राऊत यांनी यापूर्वीही सांगितलं की, मुर्मू यांचं समर्थन करणं म्हणजे ते भाजपचं समर्थन करीत नाही. भाजपसोबत 10 वर्षांची युती तोडून शिवसेनाने एनसीपी आणि काँग्रेससह मिळून महाविकास आघाडीचं सरकार केलं होतं. मात्र शिवसेनेतील एकनाथ शिंदेसह काही आमदारांनी बंडखोरी करीत बाहेर पडले. एनडीएने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. यासाठी आज विरोधी पक्षांची बैठक शरद पवारांच्या घरी आयोजित करण्यात आली होती. यावेळी पवार म्हणाले की, 17  पक्षांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. याशिवाय आप आणि टीएमसीदेखील अल्वा यांचं समर्थन करतील. 80 वर्षीय अल्वा यांंनी उत्तराखंड, राजस्थान, गोवा आणि गुजरातच्या राज्यपाल म्हणून काम पाहिलं आहे. काँग्रेसच्या खासदार असताना त्या 4 वेळा राज्यमंत्री राहिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात