• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • एका लग्नाची गोष्ट! तरुणाचं एकाच वेळी दोन तरुणींसोबत लग्न, तिघांच्याही मुलांनी केली धमाल

एका लग्नाची गोष्ट! तरुणाचं एकाच वेळी दोन तरुणींसोबत लग्न, तिघांच्याही मुलांनी केली धमाल

एका तरुणाने एकाच वेळी दोन तरुणींशी लग्न केल्याची (A man marries two girls at a time) घटना नुकतीच समोर आली आहे.

 • Share this:
  रांची, 4 ऑक्टोबर : एका तरुणाने एकाच वेळी दोन तरुणींशी लग्न केल्याची (A man marries two girls at a time) घटना नुकतीच समोर आली आहे. विशेष म्हणजे सर्वांसमोर, नातेवाईकांच्या (Marriage with two girls in an open function) उपस्थितीत या तरुणाचं लग्न दोन तरुणींशी लावण्यात आलं. त्याहून विशेष म्हणजे या तिघांचीही (Children of bride and groom) मुलं लग्नसोहळ्याला हजर होती. असं जडलं प्रेम झारखंडच्या लोहरदगा भागात संजीत उरांव नावाच्या तरुणाचं दोन तरुणींवर प्रेम होतं. लग्न होण्यापूर्वीच त्याला दोन्ही तरुणींपासून मुलंही झाली होती. हे प्रकरण पोलिसांतही गेलं होतं. मात्र या प्रश्नावर कुठलाही सर्वमान्य आणि कायदेशीर तोडगा निघत नव्हता. अखेर गावच्या पंचायतीत या विषयावर खल झाला आणि तरुणाने या दोन्ही तरुणींसोबत लग्न करावं, असं ठरलं. तरुणाला आणि दोन्ही तरुणींना हा तोडगा मान्य झाला आणि तिघांचं थाटामाटात लग्न लावण्यात आलं. दोन तरुणींसोबत लग्न संजीतचं रिंकी उरांव नावाच्या तरुणीवर गेल्या अनेक वर्षांपूर्वी प्रेम जडलं होतं. लग्न होण्यापूर्वीच या जोडप्याला तीन मुलं झाली होती. तर तीन वर्षांपासून संजीतचं कलावती उरांव नावाच्या तरुणीसोबतही प्रेमप्रकरण सुरू होतं. तिच्यापासून त्याला एक मुलगा होता. दोघींपैकी एकीसोबत लग्न करण्याचा पर्याय निवडायला संजीत तयार नव्हता आणि दोघींनाही मुलं असल्यामुळे आपलं संजीतशी लग्न व्हावं, यासाठी त्या आग्रही होत्या.- हे वाचा - चीनमधील BUSINESS DRINK ची दलदल, कॉर्पोरेट शिष्टाचाराच्या नावाखाली बलात्कार लग्नाला मुलंही हजर अखेर, या तिघांचं लग्न लावण्याचा निर्णय पंचायतीत घेण्यात आला. संजीतचं दोघींवरही प्रेम असल्यामुळे आणि दोघींनाही संजितपासून मुलं असल्याने हा विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. आपल्या आईवडिलांच्या लग्नाला तिघांचीही मुलं उपस्थित होती आणि एकमेकांसोबत खेळत धमाल करत होती. या अनोख्या रंगाची चर्चा पंचक्रोशीत जोरदार रंगली होती.
  Published by:desk news
  First published: