ग्राहक पेट्रोलची शुद्धता (Petrol Purity) तपासू शकतात. अनेकदा चुकीचं किंवा भेसळयुक्त पेट्रोल विक्री केल्याची प्रकरणंही समोर आली आहेत. पेट्रोलची शुद्धता तपासण्यासाठी पेट्रोलचे काही थेंब एका कागदावर घ्या. जर पेट्रोल शुद्ध असेल, तर कोणताही डाग न राहता ते उडून जाईल.
जर पेट्रोल शुद्ध नसेल, तर कागदावर डाग तसेच राहतील. कंज्युमर प्रोटेक्शन अॅक्ट 1986 अंतर्गत सर्व पेट्रोल पंपावर फिल्टर पेपर टेस्टची सुविधा असणं अनिवार्य आहे. यामुळे पेट्रोलची शुद्धता सहजपणे तपासता येते.
पेट्रोल भरण्याआधी सर्वात पहिले मशीनवर असलेला झीरो तपासा. त्यानंतर संपूर्ण पेट्रोल भरेपर्यंत ते मीटर चेक करा.
एखाद्या ग्राहकाने 2000 रुपयांचं पेट्रोल किंवा डिझेल घेतलं, तर पंपावरील कर्मचारी 1500 चं इधन भरुन स्टॉप करतो. त्यानंतर पुन्हा दुसऱ्याने सांगितल्यानंतर, परत तिथूनच इंधन भरण्यास सुरुवात केली जाते, जिथे त्याने स्टॉप केलं होतं.
अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक केली जाते. याला शॉर्ट फ्यूलिंग म्हटलं जातं. त्यामुळे प्रत्येक वेळी मीटर चेक करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं.