• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • गँगरेपनंतर परभणीतील अल्पवयीन मुलीची आत्महत्या; मृत्यूपूर्वी भावाला सांगितलं नेमकं काय घडलं

गँगरेपनंतर परभणीतील अल्पवयीन मुलीची आत्महत्या; मृत्यूपूर्वी भावाला सांगितलं नेमकं काय घडलं

सामूहिक बलात्कारानंतर विष प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीने अत्याचाराची दुर्दैवी कहाणी आपल्या भावाला सांगितली आहे.

सामूहिक बलात्कारानंतर विष प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीने अत्याचाराची दुर्दैवी कहाणी आपल्या भावाला सांगितली आहे.

Parbhani Minor Girl Rape Case: सामूहिक बलात्कारानंतर विष प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीने अत्याचाराची दुर्दैवी कहाणी आपल्या भावाला सांगितली आहे.

 • Share this:
  परभणी, 21 सप्टेंबर: मुंबईतील साकीनाका याठिकाणी एका 30 वर्षीय महिलेवर अमानुष बलात्कार केल्याची घटना ताजी असताना, महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत उघडकीस आली आहे. येथील (parbhani) एका अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार (gang rape) केल्यानंतर पीडित मुलीने विष प्राशन (drinking poison ) करत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असल्याने पीडितेचा जबाब नोंदवून घेण्यात आला नाही. पण पीडितेनं मुलीनं मृत्यूपूर्वी घडलेल्या अत्याचाराची कहाणी आपल्या भावाला सांगितली आहे. पीडित मुलगी ही एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. गावातील आदर्श शिंदे नावाचा मुलगा पीडितेची वारंवार छेड काढायचा. पीडितेने याबाबत आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली होती. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपी आदर्शला समजावून सांगितलं. त्यानंतर हे प्रकरण मिटल्याचं कुटुंबीयांना वाटत होतं. टीव्ही9 ने दिलेल्या वृत्तानुसार, मोबाइलमधील व्हिडीओ आपल्या हाताने डिलिट कर असं सांगत आरोपीने 12 सप्टेंबर रोजी पीडितेला गावातील एका पडक्या शाळेत बोलवलं होतं. हेही वाचा-मूल होण्यासाठी विवाहितेसोबत अघोरी प्रयोग;कोंबडीचं रक्त पाजून सासऱ्याकडून विनयभंग याठिकाणी मुख्य आरोपी आदर्श शिंदे याच्यासोबत मयुर मुंजा मुठाळ आणि सुशिल भागवत शिंदे हे दोन आरोपीही आधीपासून तिथे होते. पीडित मुलगी घटनास्थळी गेली असता, तिघांनी मिळून पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. त्यामुळे मानसिकरित्या खचलेल्या पीडितेने 14 सप्टेंबरला दुपारी 1 वाजता विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उलट्या आणि पोटदुखी सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिने विष प्यायल्याचं सांगितलं. हेही वाचा-मुलीच्या अंगातून भूत उतरवण्याच्या बहाण्याने बलात्कार; आईनेच केली भोंदूबाबाला मदत यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पीडितेला लातूर येथील शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलं. पण पीडित मुलीने सहाव्या दिवशी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. तत्पूर्वी पीडितेन रुग्णालयात आपल्यासोबत काय घडलं? याची सर्व माहिती आपल्या भावाला दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. पीडित मुलीचा मृत्यूमुळे कुटुंबीयांना एकच आक्रोश केला आहे. आरोपी नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी केली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: