मराठी बातम्या /बातम्या /देश /

जीवघेणा PUBG! रेल्वे ट्रॅकवर खेळत होते Game, ट्रेनखाली येऊन उडाल्या चिंधड्या

जीवघेणा PUBG! रेल्वे ट्रॅकवर खेळत होते Game, ट्रेनखाली येऊन उडाल्या चिंधड्या

ते दोघं नेहमीच रेल्वे ट्रॅकवरून चालताना मागून ट्रेनचा आवाज आला की बाजूला व्हायचे. मात्र एक दिवस चालता चालता मोबाईलवर पब्जी गेम खेळता खेळता मागून ट्रेन कधी आली, ते त्यांना समजलंच नाही.

    भोपाळ, 9 जानेवारी: रेल्वे ट्रॅकवरून (Railway Track) चालता चालचा (Walking) पब्जी गेम (PubG Game) खेळणाऱ्या दोन सख्ख्या भावांचा (Two brothers)  रेल्वेनं उडवल्यामुळे (Railway dash) मृत्यू (Death) झाल्याची करुण घटना नुकतीच समोर आली आहे. घरी जाण्यासाठी निघालेल्या दोघांनी वाटेत पब्जी गेम खेळण्याचा निर्णय घेतला. तो खेळता खेळता कडेनं चालण्याऐवजी गावातून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवरून तो चालू लागले. मात्र त्याचेवळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रेननं त्यांना उडवलं आणि दोघांच्याही शरीराच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या.  अशी घडली घटना मध्यप्रदेशच्या अलवरमध्ये राहणारे लोकेश मीणा आणि राहुल मीणा हे दोघं सख्खे भाऊ होते. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणंच ते दोघं शौचाला गेले होते. तिथून परत येताना त्यांनी रेल्वे ट्रॅकवरून चालायला सुरुवात केली. गावातून गेलेल्या रेल्वे ट्रॅकवरून चालणं हे ग्रामस्थांना अनेकदा सोपं पडलं. रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूच्या भागांची बिकट अवस्था पाहता ट्रॅकवरून चालत जाण्यामुळे कमी वेळात अधिक अंतर पार होतं, असा अनेक गावकऱ्यांचा अनुभव असतो. त्यामुळे शौचाला जाऊन परत घरी येताना हे दोघेदेखील रेल्वे ट्रॅकवरून चालत निघाले.  गेममध्ये झाले रममाण रेल्वे ट्रॅकवरून चालता चालता दोघांनी मोबाईल बाहेर काढला आणि त्यावर पब्जी गेम खेळायला सुरुवात केली. खेळता खेळता दोघंही त्यात इतके रममाण झाले की आजूबाजूच्या वातावरणाचा त्यांना पूर्ण विसर पडला. त्याचवेळी पाठिमागून त्यांच्या दिशेनं रानीखेत एक्सप्रेस येत होती. त्या एक्सप्रेसचा आवाज त्यांना ऐकू आला नाहीच, शिवाय मोटरमननं दिलेल्या हॉर्नकडेही त्यांचं लक्ष गेलं नाही. काही क्षणांतच रेल्वेनं दोघांनाही उडवलं आणि दोघांच्या शरीराच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या.  हे वाचा - पोलीस तपास सुरू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचेही छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिले आहेत. घटनास्थळी पोलिसांना त्यांचा मोबाईल सापडला. त्यावर पब्जी गेमचं ऍप्लिकेशन ओपन होतं. त्यावरूनच पब्जी गेम खेळताना त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. लोकेश आणि राहूुल हे सख्खे भाऊ होते आणि दोघंही अविवाहित होते. त्यांच्या अशा अकाली मृत्यूमुळे कुटुंबासोबत गावावरही शोककळा पसरली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Death, PUBG, Pubg game

    पुढील बातम्या